Home Bibles निर्गम 25:18 · मराठी बायबल
निर्गम 25:18 · मराठी बायबल

मग सोन्याचे घडीव काम करुन दोन करुब देवदूत करुन ते झाकणाच्या म्हणजे दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत.

Cross references

उत्पत्ति 3:24

परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बाग सोडण्याठी भाग पाडले. नंतर परमेश्वराने एदेन बागेची राखण करण्यासाठी बागेच्या पूर्वेकडे करुब देवदूतांना पहारा करण्यास ठेवले. तसेच तेथे जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गचे रक्षण करण्यासाठी गरगर फिरणारी अरनीची एक तलवार ठेवली.

निर्गम 25:36

हे दीपवृक्ष, फुले व फांद्या यांच्या सहीत शुद्ध सोन्याचे घडविले पाहिजे हे सर्व ठोकून व एकत्र जोडून एकसंध केले पाहिजे.

निर्गम 37:7

मग त्याने सोने घडवून दयासनाच्या दोन्ही टोकासाठी दोन करुब दूत बनविले.

1 शमुवेल 4:4

मग त्यांनी शिलो येथे माणसे पाठवली. त्यांनी तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कराराचा कोश आणला. त्या कोशाच्या वरच्या बाजूला करुबांची बैठक होती. परमेश्वराचे ते सिंहासन होते. कोश आणला तेव्हा त्या बरोबर हफनी आणि फिनहास हे एलीचे दोन पुत्रही होते.

1 राजे 6:23

कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी 15 फूट होती. ते अतिपवित्र गाभाऱ्यात ठेवले.

1 राजे 8:6

मद याजकांनी परमेश्वराचा तो करारकोश योग्य जागी ठेवला. मंदिरातील अतिपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला.

1 इतिहास 28:18

धूप जाळण्यासाठी जी वेदी करायची तिला लागणारे सोने किती हे ही त्याने सांगितले. परमेश्वराच्या करारकोशावर जे करुब देवदूत आपले पंख पसरुन धरत होते त्यासह असलेले दयासन म्हणजेच देवाचा रथ याचा नमुनाही शलमोनाला त्याने दिला. हे करुब सोन्यात करायचे होते.

2 इतिहास 3:10

अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले.

यहेज्केल 10:2

नंतर सिंहासनावर जो बसलेला होता तो तागाचे कपडे घातलेल्याला देव म्हणाला, “करुब दूताच्या खाली असलेल्या चाकांच्या मधल्या जागेतपाऊल टाक. त्यांच्या मधून थोडे निखारे घे. व ते यरुशलेमवर भिरकावून दे.”तो माणूस माझ्या जवळून पुढे गेला.

यहेज्केल 10:3

तो करुबाकडे गेला तेव्हा करुब मंदिराच्या दक्षिणेकडील भागात उभे होते. ढगाने आतले अंगण व्यापले.

यहेज्केल 10:20

मग मी खबार कालव्याजवळ इस्राएलच्या देवाच्या प्रभेखाली पाहिलेल्या प्राण्याला ओळखले आणि माझ्या लक्षात आले की ते प्राणी म्हणजे करुब दूतच होते.

यहेज्केल 41:18

तेथे करुब देवदूतांच्या आकृती आणि खजुरीची झाडे कोरलेली होती. करुब देवदूतांच्यामध्ये खजुरीचे झाड कोरलेले होते. प्रत्येक करुबाला दोन तोंडे होती.

इब्री लोकांस 9:5

या पेटीवर (कोषावर) गौरवाचे करूबीम दयासनावरसावली करीत होते. परंतु या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा आता आपण करू शकत नाही.

Interlinear

Choose Theme