या पेटीवर (कोषावर) गौरवाचे करूबीम दयासनावरसावली करीत होते. परंतु या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा आता आपण करू शकत नाही.
Cross references
मग शुद्ध सोन्याचे एक झाकण बनवावे; ते पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रूंद असावे;
नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले; ते पंचेचाळीस इंच लांब व सत्तावीस इंच रुंद होते.
तो म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल!
त्याने तो परमेश्वरासमोर अग्नीवर, इतका घालावा की त्याच्या धुराने आज्ञापटावरील दयासन व्यापून टाकावे म्हणजे मग तो मरणार नाही;
मोशे परमेश्वराशी बोलण्यासाठी दर्शनमंडपात गेला त्यावेळी त्याने परमेश्वराची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. ती, पाणी आज्ञापटाच्या कोशावरील कोशावरील पवित्र दयासनावरुन दोन करुब दूतांच्या दरम्यान असलेल्या भागातून येत होती. अशा प्रकारे देव मोशेबरोबर बोलला.
मग त्यांनी शिलो येथे माणसे पाठवली. त्यांनी तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कराराचा कोश आणला. त्या कोशाच्या वरच्या बाजूला करुबांची बैठक होती. परमेश्वराचे ते सिंहासन होते. कोश आणला तेव्हा त्या बरोबर हफनी आणि फिनहास हे एलीचे दोन पुत्रही होते.
मद याजकांनी परमेश्वराचा तो करारकोश योग्य जागी ठेवला. मंदिरातील अतिपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला.
परमेश्वराची प्रार्थना करुन हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस,
दावीदाने मग मंदिराचा आराखडा, आपला मुलगा शलमोन याच्या स्वधीन केला. मंदिराभोवतालचे आवार, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचाही त्या आराखड्यात समावेश होता.
इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक. तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस. राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस. आम्हाला तुला बघू दे.
परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
यासाठी की आता मंडळीद्धारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे.
म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.
स्वर्गातून पाठविलेल्या आत्म्याद्वारे ज्यांनी शुभवर्तमान तुमच्याकडे आणले, त्यांनीच तुम्हांस आता या गोष्टी विदित केल्या. त्याच गोष्टी कळविण्याची जी सेवा ते करीत होते, ती स्वत:साठी नाही, तर आमच्यासाठी करीत होते, त्या गोष्टी बारकाईने पाहण्यासाठी देवदूतसुद्धा उत्सुक आहेत.