निर्गम 16:31 · मराठी बायबल
लोक त्या विशेष अन्नला “मान्ना” म्हणू लागले; ते धण्यासारखे पांढऱ्या रंगाचे होते त्याची चव मध घालून केलेल्या सपाट पोळी सारखी होती.
Cross references
निर्गम 16:15
ते पाहून इस्राएल लोकांनी एकमेकांना विचारले, “ते काय आहे?”त्यांनी असे विचारले कारण ते काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा मोशेने त्यांना सांगितले, “परमेश्वर हे अन्न तुम्हाला खाण्याकरिता देत आहे.
गणना 11:6
परंतु आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्हाला येथे काही ही खावयास मिळत नाही!”
गणना 11:7
(हा मान्ना लहान धण्यासारखा होता, आणि तो झाडाच्या डिंकासारखा दिसे.
गीतरत्न 2:3
प्रियकरा इतर पुरुषांमध्ये तू रानटी झाडांमध्ये असलेल्या सफरचंदाच्या झाडासारखा आहेस.मला माझ्या प्रियकराच्या सावलीत बसायला आवडते. त्याचे फळ मला गोड लागते.