Home Bibles एस्तेर 1:12 · मराठी बायबल
एस्तेर 1:12 · मराठी बायबल

पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वश्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला.

Cross references

उत्पत्ति 3:16

नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला,“तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील. तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”

निर्गम 32:19

मोशे छावणीजवळ येऊन पोहोंचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरु व लोकांच्या नाच गाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली फेकून दिल्या; तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्यावर पडून फुटल्या व त्यांचे तुकडे तुकडे झाले.

निर्गम 32:22

अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; हे लोक जे वाईट ते करावयास तत्पर असतात, हे आपणास माहीत आहे.

अनुवाद 29:20

परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. इतर सर्व इस्राएलापासून अलग करुन परमेश्वर त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या ग्रंथातील सर्व शापांचा प्रत्यय त्या माणसाला स्वत:च्या बाबतीत येईल. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील कराराचा हा एक भाग आहे.

स्तोत्रसंहिता 74:1

देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का? देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?.

स्तोत्रसंहिता 79:5

देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का? देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?

नीतिसूत्रे 19:12

राजा रागावतो तेव्हा ते सिंहाच्या गर्जनेसारखे वाटते. पण तो जर तुमच्यावर खुश असला तर ते हळुवार पावसासारखे वाटते.

नीतिसूत्रे 20:2

राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो. तुम्ही जर राजाला राग येऊ दिला तर तुम्ही तुमचे प्राणदेखील गमावू शकता.

दानीएल 2:12

हे बोलणे ऐकून राजाचा पारा चढला. मग त्याने बाबेलमधील सर्व ज्ञानी माणसांना ठार करण्याचा हुकूम दिला.

दानीएल 3:13

नबुखद्नेस्सरला राग आला. त्याने शद्रख, मेशख व अबेद्नगो यांना बोलविणे पाठविले. मग त्यांना राजापुढे आणण्यात आले.

दानीएल 3:19

मग नबुखद्नेस्सराला खूप राग आला. त्याने शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्याकडे तुच्छतेने पाहिले. त्याने भट्टी नेहमीपेक्षा सातपट तापविण्याची आज्ञा दिली.

नहूम 1:6

परमेश्वराच्या भयंकर क्रोधाला कोणीही तोंड देऊ शकणार नाही त्याचा भयानक राग कोणीही सहन करू शकणार नाही त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे धगधगणारा असेल. तो येताच खडक हादरतील.

इफिसकरांस 5:22

पत्नींनो, जशा तुम्ही प्रभुच्या अधीन होता, तशा आपल्या पतींच्या अधीन असा.

इफिसकरांस 5:24

पण, ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.

1 पेत्र 3:1

त्याचप्रमाणे, पत्नींनो, आपल्या पतींच्या अधीन असा. यासाठी की, त्यांच्यापैकी काहींनी जर देवाची आज्ञा पाळली नाही तर काही न बोलताही आपल्या सदवर्तनाने त्यांची मने जिंकता येतील.

प्रकटीकरण 6:16

लोक पर्वतांना आणि खडकांनाम्हणाले, “आमच्यावर पडा. जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या चेहऱ्यासमोरुन आम्हांला लपवा. कोकऱ्याच्या रागापासूनआम्हाला लपवा.

Interlinear

Choose Theme