द्राक्षारस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका. त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बेताल होतो. उलट आत्म्याने पूर्ण भरले जा,
Cross references
त्याने द्राक्षारस तयार केला व तो भरपूर प्याला; तो द्राक्षारसाने धुंद झाला व आपल्या तंबूत उघडानागडा पडला.
तर आता आपणाला मुले होण्याकरिता आपण आपल्या वडिलांचा उपयोग करु, तेव्हा आपण आपल्या वडिलाकडे जाऊन त्यांना भरपूर द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्यापाशी निजू म्हणजे मग त्यामुळे आपला वंश चालू राहील.”
त्यांनी सांगावे की, हा उद्दाम आहे. आमचे ऐकत नाही. तसेच तो खादाड व मद्यपी आहे.
तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे. माझे ओठ तुझी स्तुती करतात.
ते सार्वजनिक ठिकाणी माझ्याबद्दल बोलतात. मद्य पिणारे लोक माझ्यावर गाणी रचतात.
द्राक्षारस आणि मद्य यामुळे लोकांचा स्वत:वरचा ताबा जातो. ते खूप जोरात बोलतात आणि फुशारकी मारायला लागतात. ते झिंगलेले असतात आणि मूर्खासारख्या गोष्टी करायला लागतात.
खूप खाणाऱ्या आणि खूप द्राक्षारस पिणाऱ्या लोकांशी मैत्री करु नकोस.
जे लोक खूप द्राक्षारस पितात आणि कडक मद्य घेतात, त्यांच्याकरता ते खूप वाईट आहे. ते लोक खूप भांडणे आणि वाद - विवाद करतात. त्यांचे डोळे पण लाल असतात. ते अडखळतात आणि पडतात. ही सगळी संकटे त्यांना टाळता आली असती.
मला तुझ्याबरोबर ने. आपण पळून जाऊ.राजाने मला त्याच्या खोलीत नेले.आम्ही आनंदोत्सव करु आणि तुझ्यासाठी आनंदित होऊ. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे हे लक्षात ठेव. तरुणी तुझ्यावर योग्य कारणासाठी प्रेम करतात.
तुझे तोंड सर्वात उंची द्राक्षारसाप्रमाणे सरळ माझ्या प्रेमाकडे वाहणाऱ्या, झोपलेल्याच्या ओठांत जाणाऱ्या द्राक्षारसाप्रमाणे असू दे.
लवकर उठून नशा आणणाऱ्या पेयाच्या शोधास लागणाऱ्यांनो तुमचा धिक्कार असो. तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.
मद्य पिण्यात त्यांची प्रसिध्दी आहे आणि मद्याचे मिश्रण करण्यात ते तरबेज आहेत.
त्या वेळेस, सर्वशक्तिमानपरमेश्वर, डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल. मेजवानीत उत्कृष्ट अन्नपदार्थ व उंची मद्य असेल. मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल.
“तहानलेल्यांनो, या आणि पाणी प्या. तुमच्याजवळ पैसा नसला तरी काळजी करू नका. या आणि पोटभर खा, प्या. अन्न आणि मद्य ह्यासाठी पैसे पडणार नाहीत.
सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या सैन्याचे रक्षण करील. दगड व गोफणीचा उपयोग करुन ते शत्रूचा पराभव करतील. ते त्यांच्या शत्रू - सैन्याचे रक्त सांडतील. मद्याप्रमाणे शत्रूच्या रक्ताचे पाट वाहतील. ते रक्त, वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडलेल्या रक्ताप्रमाणे असेल.
निमअहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताटवाट्या बाहेरून घासता पुसता पण लोकांना फसवून कमावलेला फायदा आणि असंयम यानी त्या आतून भरल्या आहेत.
तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल.
देवाच्या दृष्टीने तो महान होईल. त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये. आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.
जर तुम्ही इतके वाईट असताना तुम्हांला तुमच्या मुलांना चांगल्या देण्याचे समजते, तर जे त्याच्याकडे मागतात त्यांना स्वर्गातील पिता किती तरी अधिक पवित्र आत्मा देईल?”
पण जर तो नोकर मनात म्हणतो, “माझा मालक येण्यास फार विलंब लावतो.’ व तो त्याच्या स्त्री व पुरुष नोकरांना मारहाण करतो व खाण्यापिण्यास सुरुवात करतो.
सावध राहा, दारुबाजी आणि अधाशीपणात तुमचा वेळ घालवू नका, किंवा ऐहिक गोष्टींमध्ये मग्न राहू नका. जर तुम्ही तसे कराल, तर तुम्ही व्यवस्थित विचार करु शकणार नाही, व तुम्ही तयार नसताना तो दिवस (शेवट) अकस्मात तुमच्यावर येईल.
दुसरे लोक प्रेषितांना हसत होते. त्यांना असे वाटले की, प्रेषित द्राक्षारस खूप प्रमाणात प्यालेले आहेत.
दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो, तसे वागूया. खादाडपणात, मद्यपानात, लैगिकतेत, स्वैरपणात, भांडणात, द्वेषात नको, 14तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा. आणि आपल्या पापी वासना मध्ये गुंतून राहू नका.
परंतु असे आहे की, मी तुम्हांला लिहिले होते, तुम्हांतील जो कोणी स्वत:ला बंधु म्हणतो, परंतु जर तो जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक निंदक, मद्यपि, फसविणारा असेल तर त्याची संगत धरु नये. अशा माणसाबरोबर भोजनसुद्धा करु नये.
दरोडेखोर, लोभी, दारुडे, निंदा करणारे, फसविणारे यांपैकी कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाही.
कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हांतील प्रत्येक जण अगोदरच आपले स्वत:चे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा प्यायलेला असतो.
दारुबाजी, रंगेलपणा, अशासारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी. या गोष्टीविषयी मीतुम्हांला सूचना देत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हांला सूचना केल्या होत्या. जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्याराज्यात वाटा मिळणार नाही.
कारण जे झोपातात ते रात्री झोपतात व जे दारु पितात ते रात्री दारु पितात,
ज्याच्यावर दुराचरणाचा दोष नसेल, ज्याला एकच पत्नी असेल, ज्याला मुले असून ती विश्वासणारी असतील. ज्याच्यावर स्वैर जीवन जगल्याचा आरोप नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीस नेमावे.
कारण तुम्ही आजपर्यंत विदेशी लोकांसारखे आयुष्य जगत आला म्हणजे तुम्ही कामातुरपणाच्या कृतीत चालला, देहवासना, मद्यापान, बदफैलीपणा, रंगेलपणा आणि अमंगळ मूर्तिपूजा यात बेभान जीवन जगलात.