ते सार्वजनिक ठिकाणी माझ्याबद्दल बोलतात. मद्य पिणारे लोक माझ्यावर गाणी रचतात.
Cross references
त्या दिवशी संध्याकाळी ते दोन देवदूत सदोम नगरात आले. नगराच्या वेशी जवळ बसलेल्या लोटाने त्यांस पाहिले; लोट उठून त्यांस सामोरा गेला आणि त्याने त्यांस आदराने लवून नमल केले.
“तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे.
ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत. काहीही नाव नसलेल्या या लोकांना त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे.
जेव्हा ते लोक आजारी पडले तेव्हा मला वाईट वाटले, अन्न न खाऊन मी माझे दुख प्रकट केले. त्यांच्यासाठी प्रार्थना करुन मी हेच मिळवले का?
परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सच्चे मित्र नव्हते. मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हतो परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला.
परमेश्वरा, तू मला मोहित केलेस आणि मी पण मोहित झालोतू माझ्यापेक्षा समर्थ असल्याने तू जिंकलास मी हास्यास्पद ठरलो. लोक माझ्याकडे पाहून हसतात आणि माझी चेष्टा करतात.
राजाने मद्य पिता-पिता आपल्या सेवड्ढांना सोन्या चांदीचे प्याले आणण्याचा हुकूम दिला. हे प्याले, त्याचे आजोबा नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणले होते. राजघराण्यातील लोकांनी राजाच्या स्त्रियांनी आणि दासींनी त्या प्याल्यांतून मद्य प्यावे अशी राजाची इच्छा होती.
नाही! तू नम्र झाला नाहीस उलट तू स्वर्गातल्या देवाच्याविरुध्द गेलास. देवाच्या मंदिरातील प्याले आणण्याचा तू हुकूम दिलास. त्या प्याल्यातून तू, तुझे राजदरबारी, तुझ्या स्त्रिया आणि दासी मद्य प्यालात, आणि सोने-चांदी, कासे, लोखंड, लाकूड वा दगड यांच्यापासून बनविलेल्या देवतांची तू स्तुती केलीस. ते खरे देव नाहीत. ते पाहू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत. त्यांना काही समजत नाही तू, तुझ्या जीवनावर व तू करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ज्या देवाचे प्रभुत्व आहे, त्याचा मान राखला नाहीस.
पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.
पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडील जनांनी लो कसमुदायाचे मन वळविले.
तसेच मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, वडील हेही तेथे होते. तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले.
त्या दिवसाला तयारीचा दिवसम्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परुशी पिलातकडे गेले.
त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झागा घातला व काट्यांचा मुगुट करुन त्याला घातला.
व ते त्याच्यावर आरोप करु लागले. ते म्हणाले, “आम्ही या माणसाला लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वत: ख्रिस्त, एक राजा आहे.”
या भूतलावरील राजे लढाईसाठी सज्ज झाले आणि प्रभु परमेश्वर व त्याचा रिव्रस्त यांच्याविरुद्ध एकवट झाले आहेत.’ स्तोत्र. 2:1-2