Home Bibles उपदेशक 6:2 · मराठी बायबल
उपदेशक 6:2 · मराठी बायबल

देव माणसाला खूप संपत्ती, धनदौलत आणि मानमरातब देतो, त्या माणसाजवळ त्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी आणि त्याला जे जे हवे ते सर्व असते. परंतु देव त्याला या सगळ्याचा उपभोग घेऊ देत नाही. कोणीतरी अनोळखी येतो आणि सारे काही घेऊन जातो. ही अतिशय वाईट आणि निरर्थक गोष्ट आहे. ळ्य

Cross references

अनुवाद 8:7

तुमचा देव परमेश्वर तुम्हाला उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्यानाले आहेत.

अनुवाद 28:33

“तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल. लोक तुमची उपेक्षा करतील.

अनुवाद 28:43

तुमच्या गावात राहाणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल.

शास्ते 18:10

तेथे जागा भरपूर आहे, अन्नधान्य मुबलक आहे. तेथे गेल्यावर तुमच्या ते लक्षात येईलच. शिवाय, हल्ल्याची लोकांना कल्पनाही नसल्याने ते निर्धास्त आहेत. खरोखर परमेश्वराने ही जमीन आपल्याला दिली आहे.”

1 राजे 3:13

शिवाय तू न मागितलेल्या गोष्टीही बक्षीस म्हणून मी तुला देईन. आयुष्यभर तुला मानसन्मान थोर राजा कोणी असणार नाही.

1 इतिहास 29:25

परमेश्वराने शलमोनाची भरभराट केली. परमेश्वराच्या कृपेने तो मोठा होत आहे हे इस्राएलींना ठाऊक होते. राजाला शोभेल असा दरारा परमेश्वराने त्याला प्राप्त करुन दिला. इस्राएलाच्या या आधीच्या कोणाही राजाच्या वाट्याला असे भाग्य आले नव्हते.

1 इतिहास 29:28

पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्याला सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्याला कमतरता नव्हती. त्याच्यानंतर त्याच्या मुलगा शलमोन राजा झाला.

2 इतिहास 1:11

तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तुझे म्हणणे बरोबर आहे. तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा मानसन्मान यांची मागणी केली नाहीस. शत्रूंचा नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस. स्वत:साठी दीर्घायुष्य मागितले नाहीस. यापैकी काहीही न मागता ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेसाठी धोरणीपणाने निर्णय घेता यावेत म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस.

ईयोब 21:9

त्यांची घरे सुरक्षित असतात आणि त्यांना भय नसते. दुष्टांना शिक्षा करण्यासाठी देव आपली छडी वापरीत नाही.

स्तोत्रसंहिता 17:14

परमेश्वरा, तुझ्या शक्तीचा उपयोग करुन, या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर. परमेश्वरा, तुझ्याकडे मदतीसाठीखूप लोक येतात. त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते. त्या लोकांना खूप अन्न दे. त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे. त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल.

स्तोत्रसंहिता 39:6

आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते. आपली सगळी संकटे निष्कारणच असतात. आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्यालामाहीत नसते.

स्तोत्रसंहिता 73:7

जर त्या लोकांना एखादी गोष्ट आवडली तर ते सरळ जातात आणि ती घेऊन येतात. त्यांना जे काही करायची इच्छा होते ते ते करतात.

उपदेशक 2:4

नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी घरे बांधली, मी स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले.

उपदेशक 4:4

नंतर मी विचार केला, “लोक इतके कष्ट का करतात?” लोक यश मिळवायचा प्रयत्न करतात आणि इतरांपेक्षा चांगले होतात. का? कारण लोक मत्सरी असतात. लोकांकडे आपल्यापेक्षा अधिक असावे असे त्यांना वाटत नाही. हे अविचारी आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

उपदेशक 4:8

एखाद्याचे कुटुंब नसेल. त्याला मुलगा किंवा भाऊ नसेल. परंतु तो खूप काबाडकष्ट करत राहील. त्याच्या जवळ जे आहे त्यात त्याला कधीही समाधान वाटणार नाही. आणि तो इतके करतो की तो जरा थांबून स्वत:ला कधीही विचारत नाही, “मी इतके कष्ट का करीत आहे? मी आयुष्याचा उपभोग का घेत नाही?” ही देखील एक अतिशय वाईट आणि अविचारी गोष्ट आहे.

उपदेशक 5:16

हे फारच वाईट आहे म्हणून “वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यात माणसाला काय मिळते?”

उपदेशक 5:18

मी पाहिले आहे की, माणूस करू शकेल अशी चांगली गोष्ट पुढीलप्रमाणे आहे: माणासाने पृथ्वीवरील त्याच्या लहानशा आयुष्यात खावे. प्यावे आणि काम करण्यात आनंद मिळवावा. देवाने त्याला काही दिवसांचेच आयुष्य दिले आहे आणि फक्त तेव्हढेच त्याच्याजवळ आहे.

उपदेशक 5:19

जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार त्याने केला पाहिजे, आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे.

विलापगीत 5:2

आमचा देश परक्यांच्या हातात गेला आहे. आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.

दानीएल 5:18

राजा,परात्पर देवाने, तुझ्या आजोबांना,राजा नबुखद्नेस्सरला खूप मोठा व सामर्थ्यशाली राजा केले. देवाने राजाला खूप महत्व दिले.

होशेय 7:9

परके एफ्राईमची शक्ती नष्ट करतात. पण एफ्राईमला ते कळत नाही. त्याच्यावर पिकलेले केस पसरले आहेत. पण ते त्याला माहीत नाही.

लूक 12:19

आणि मी माझ्या जिवाला म्हणेन, जिवा, तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी अनेक वर्षे पुरतील इतक्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.”

Interlinear

Choose Theme