“त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभउपटून टाका, मूर्ती जाळून टाका.
Cross references
“परंतु या सर्व लोकांच्या दैवतांची पूजा करु नका; त्यांना नमन करु नका; त्याच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही कधीही वागू नये; त्यांच्या मूर्तीचा तुम्ही नाश करावा, आणि त्यांच्या मूर्तीच्या स्मारकांचे दगड व स्तंभ तोडून फोडून टाकावे.
नंतर लोकांनी बनविलेल ते सोन्याचे वासरु मोशेने तोडून फोडून टाकले व ते अग्नीत वितळवले; त्याचा कुटून त्याने भुगाभुगा केला; मग तो त्याने पाण्यात टाकला व ते पाणी त्याने इस्राएल लोकांस प्यावयास लावले.
परंतु त्यांच्या वेद्या नष्ट करा; ते उपासना करीत असलेले दगडधोंडे तोडून टाका; त्यांच्या मूर्ती फोडून टाका.
“तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका; तसेच कोरीव मूर्ती किंवा स्मारक स्तंभ आठवणींचा बुरुज-उभारु नका अथवा पूजा करण्यासाठी आपल्या देशात, कोरीव पाषाण स्थापन करु नका; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!
“त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही आगीत टाकून जाळून टाका. त्या मूर्तीवरच्या चांदीसोन्याचा मोह धरु नका, ते घेऊ नका. कारण तो सापळाच आहे. त्याने तुमचे आयुष्य बरबाद होईल. परमेश्वर आपला देव मूर्तिद्वेष्टा आहे.
मग तुमचे ते पापीकृत्य-तुम्ही केलेली वासराची मूर्ती-मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करुन भस्म करुन टाकले व डोंगरावरुन वाहाणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.
आता तेथे असलेल्या राष्ट्रांना घालवून तुम्ही ती जमीन ताब्यात घेणार आहात. तेथील लोकांची सर्व पूजास्थळे तुम्ही नेस्तनाबूत करुन टाका. उंच पर्वत, टेकड्या, हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी ही पूजास्थळे विखुरलेली आहेत.
तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ती जाळा, त्यांच्या दैवतांच्या मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्या ठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही.
कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारु नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.
त्याच रात्री परमेश्वर गिदोनशी बोलला. तो म्हणाला, “तू तुझ्या वडीलांचा, सात वर्षाचा पूर्ण वाढलेला बैल घे. तुझ्या वडीलांनी बआल या खोट्या दैवताची वेदी बांधली आहे. तिच्या शेजारी लाकडी स्तंभही आहे. अशेरा या देवीच्या सन्मानार्थ तो आहे. बैलाकरवी तू तुझ्या वडीलांच्या मालकीची ती वेदी नष्ट कर आणि अशेरा स्तंभाची मोडतोड कर.
स्मृतिस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि देऊळ जाळले.
योशीयाने परमेश्वराच्या मंदिरातून अशेराचा स्तंभ हलवला. तो गावाबाहेर किद्रोन खोऱ्यात नेऊन जाळून टाकला. नंतर त्याने जळलेल्या भागाच्या तुकड्यांची राख केली. ती सामान्य लोकांच्या थडग्यांवर विखरुन टाकली.
त्याने सर्वच्या सर्व स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब यांची पार मोडतोड केली आणि त्या ठिकाणावर मृत माणसांच्या अस्थी पसरुन टाकल्या.
पलिष्ट्यांनी आपली दैवाने तिथेच एफाईम दिली. दावीदाने आपल्या माणसांना त्या मूर्ती जाळून टाकायला सांगितल्या.