Home Bibles अनुवाद 32:34 · मराठी बायबल
अनुवाद 32:34 · मराठी बायबल

“परमेश्वर म्हणतो अर्थात ही शिक्षा सध्या मी राखून ठेवली आहे. माझ्या भांडारात ती बंदीस्त ठेवली आहे.

Cross references

अनुवाद 29:28

क्रोधायमान होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?

ईयोब 14:17

तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवावीस अंसे मला वाटते. ती पिशवी मोहोरबंद कर आणि फेकून दे.

यिर्मया 2:22

जरी तू स्वत:ला खारान धुतलेस, खूप साबण लावलास, तरी मला तुझ्या अपराधाचा डाग दिसू शकेल.” हा परमेश्वर देवाकडून आलेला संदेश होता.

होशेय 13:12

“एफ्राईमने आपला अपराध लपविण्याचा प्रयत्न केला. त्याचे पाप म्हणजे गुप्त गोष्ट हे असे त्याला वाटले पण त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळेल.

रोमकरांस 2:5

पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वत:च तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव (तुम्हाला) त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील.

1 करिंथकरांस 4:5

म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभु येईपर्यंत न्यायनिवाडा करु नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंत: करणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.

प्रकटीकरण 20:12

नंतर मेलेलेलहानथोर लोक सिंहासनासमोर उभे राहिलेले मी पाहिले. अनेक पुस्तके उघडलेली होती. आणि आणखी एक. म्हणजे जीवनीपुस्तक उघडले होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या त्या मेलेल्या लोकांच्या कृतीप्रमाणे त्यांचा न्यायनिवाडा करण्यातआला.

Interlinear

Choose Theme