त्यांची द्राक्षे कडू जहर आणि द्राक्षारस सापाच्या विषारी गरळासमान आहे.
Cross references
परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. त्याच्या आत त्याचे सर्वाच्या विषासारखे कडू जहर होईल.
ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही. ते सत्य ऐकायला नकार देतात.
नागाला गारुड्याचे संगीत वा गाणे ऐकू येत नाही आणि ती दुष्ट माणसे या सारखी आहेत.
त्यांच्या जिभा विषारी सापासारख्या आहेत. जणु काही त्यांच्या जिभेखाली सापाचे विष आहे.
“आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या, जर परमेश्वर आपला देव, आपल्याला मारणारच असेल तर आपण तेथेच मरु या. आपण परमेश्वराविरुद्ध वागून पाप केले. म्हणून देवाने आपल्याला विषारी पाणी प्यायला दिले.
“लोकांची तोंडे उघड्या कबरांसारखी आहेत ते आपल्या जिभांनी लोकांना फसवितात.” स्तोत्र. 5:9“ते ज्या गोष्टी बोलतात त्यात सापाचे विष असते.” स्तोत्र. 140:3