Home Bibles अनुवाद 27:3 · मराठी बायबल
अनुवाद 27:3 · मराठी बायबल

त्यावर या आज्ञा आणि शिकवण लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्या दिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या धनधान्यसंपन्न भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हाला देण्यासाठी वचन दिले आहे.

Cross references

लेवीय 20:24

“मी तुम्हास सांगितले आहे की त्यांचा देशतुमचे वतन होईल! तो मी तुमच्या ताब्यात देत आहे.“त्यात दुधामधाचे प्रवाह वाहात आहेत; इतर राष्ट्रापासून वेगळे करुन मी तुम्हाला माझे विशेष लोक म्हणून चालविले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे!

गणना 13:27

ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हाला पाठवलेस त्या प्रदेशात आम्ही गेलो. तो प्रदेश अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेलाआहे. त्या प्रदेशात होणारी ही काही फळे पाहा.

गणना 14:8

तो प्रदेश चांगल्या चांगल्या गोष्टींनी संपन्न आहे. आणि जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या प्रदेशात नेईल आणि तो प्रदेश आपल्याला देईल.

अनुवाद 6:3

इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे भले होईल. तुम्हाला भरपूर संतती होईल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल.

अनुवाद 6:8

त्या लिहून आठवणीसाठी हाताला बांधा व कपाळावर चिकटवा.

अनुवाद 26:9

आणि येथे आम्हाला आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हाला दिली.

यहोशवा 8:32

त्याठिकाणी समस्त इस्राएल लोकांसाठी म्हणून यहोशवाने मोशेच्या नियमशास्त्राची पाषाणांवर नक्कल करून ठेवली.

यिर्मया 11:5

“तुमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाकरिता मी हे केले. दूध व मध यांची रेलचेल असलेली सुपीक भूमी द्यायचे मी त्यांना कबूल केले होते. त्याच भूमीवर तुम्ही आता राहत आहात.”मी (यिर्मयाने) ‘होय, परमेश्वरा!’ म्हणून पुष्टी दिली.

यिर्मया 31:31

परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “मी इस्राएलच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करण्याची वेळ येत आहे.

यिर्मया 32:22

“परमेश्वरा, ही भूमी तू इस्राएलच्या लोकांना दिलीस. फार पूर्वी हीच भूमी तू त्यांच्या पूर्वजांना द्यायचे कबूल केले होतेस. ही फार चांगली भूमी आहे. ह्या चांगल्या भूमीवर अनेक चांगल्या गोष्टी आहेत.

2 करिंथकरांस 3:2

तुम्ही स्वत:च आमची शिफारसपत्रे आहात. आमच्या अंत:करणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले.

इब्री लोकांस 8:6

परंतु येशूला नेमून दिलेली याजकीय सेवा मुख्य याजकांच्या सेवेहून जशी फारच वरच्या दर्जाची आहे, तसाच येशू ज्या नवीन कराराचा मध्यस्थ आहे, तो करार अगोदरच्या कराराहून अधिक वरच्या दर्जाचा आहे, कारण तो करार अधिक चांगल्या वचनांच्या पायावर उभा आहे.

इब्री लोकांस 10:16

“त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी हा करार करीन, असे प्रभु म्हणतो, मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात ठेवीत आणि ते त्यांच्या मनावर लिहीन. यिर्मया 31:33

Interlinear

Choose Theme