Home Bibles गणना 14:8 · मराठी बायबल
गणना 14:8 · मराठी बायबल

तो प्रदेश चांगल्या चांगल्या गोष्टींनी संपन्न आहे. आणि जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या प्रदेशात नेईल आणि तो प्रदेश आपल्याला देईल.

Cross references

निर्गम 3:8

आता मी खाली जाऊन माझ्या लोकांचा मिसरच्या लोकांपासून बचाव करीन; मी त्यांना ह्या देशातून काढून जेथे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अशा चांगल्या देशातजेथे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी असे विविध प्रकारचे लोक राहतात, तेथे घेऊन जाईन.

गणना 13:27

ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हाला पाठवलेस त्या प्रदेशात आम्ही गेलो. तो प्रदेश अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेलाआहे. त्या प्रदेशात होणारी ही काही फळे पाहा.

अनुवाद 10:15

त्याचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातर त्याने इतरांना वगळून तुम्हांला आपले मानले. आजही वस्तूस्थिती तीच आहे.

यहोशवा 14:12

तेव्हा परमेश्वराने त्यावेळी कबूल केलेला डोंगराळ प्रदेश आता मला दे. मजबूत बांध्याचे अनाकी लोक तेथे राहतात, त्याची शहरे खूप मोठी असून चांगली सुरक्षित आहेत हे तू ऐकले आहेसच. पण परमेश्वराची साथ मला असेल तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना आजही हुसकावून लावू शकेन.”

2 शमुवेल 15:25

राजा दावीद सादोकला म्हणाला, “हा देवाचा पवित्र कोश यरुशलेमला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरुशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल.

2 शमुवेल 22:20

परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.

1 राजे 10:9

परमेश्वर देव थोर आहे. तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलचा राजा केले. परमेश्वराचे इस्राएलवर प्रेम आहे. म्हणूनच त्याने तुला राजा केले. तू नियमशास्त्राचे पालन करतोस आणि लोकांना न्यायाने वागवतोस.”

2 राजे 18:32

तुमच्या भूमीसारख्याच दुसऱ्या भूमीत मी तुम्हाला घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे ह्दयपरिवर्तन करु पाहात आहे. ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.

स्तोत्रसंहिता 22:8

ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग. कदाचित् तो तुला मदत करेल. तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.”

स्तोत्रसंहिता 147:10

युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक त्याला आनंद देत नाहीत.

स्तोत्रसंहिता 147:11

जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो. जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.

यशया 62:4

‘देवाने त्याग केलेली माणसे’ असे तुम्हाला कधीही कोणी म्हणणार नाही. तुमच्या भूमीला ‘देवाने नाश केलेली’ असे कोणी केव्हाही म्हणणार नाही. उलट, तुम्हाला ‘देवाची आवडती माणसे’ असे म्हणतील तुमच्या भूमीला ‘देवाची वधू’ म्हणतील. का? कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमची भूमी त्याच्या मालकीची आहे.

यिर्मया 32:41

ते मला प्रसन्न ठेवतील. त्यांचे भले करण्यात मला मौज वाटेल. मी त्यांना ह्या भूमीत रुजवीन आणि वाढवीन. मी माझ्या अंत:करणापासून हे करीन.”‘

सफन्या 3:17

परमेश्वर तुझा देव, तुमच्याबरोबर आहे. तो बलवान वीराप्रमाणे आहे. तो तुला वाचवील. तो तुझ्यावर किती प्रेम करतो, हे तो तुला दाखवून देईल. तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे, हेही तुला दिसेल.

रोमकरांस 8:31

यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण?

Interlinear

Choose Theme