Home Bibles अनुवाद 17:2 · मराठी बायबल
अनुवाद 17:2 · मराठी बायबल

“तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या प्रदेशात राहायला लागल्यावर एखाद्या नगरात दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर येईल. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या बाईच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळेल. परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध

Cross references

निर्गम 22:19

“कोणालाही पशूबरोबर शारीरिक संबंध ठेवू देऊ नयेत पशुगमन करणाऱ्यास अवश्य जिवे मारावे.

लेवीय 20:2

“तू इस्राएल लोकांना आणखी असे सांग की इस्राएल लोकांपैकी किंवा इस्राएल लोकांमध्ये राहाणाऱ्या परदेशीयापैकी कोणी आपल्या मुलाबाळांतून एखादे मूल मोलख दैवतास अर्पील तर त्या माणसाला जिवे मारावे! आपल्या देशाच्या लोकांनी त्याला धोंडमार करावा!

लेवीय 26:15

तुम्ही जर माझे नियम मानण्यास व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मग तुम्ही माझा करार मोडाल.

लेवीय 26:25

तुम्ही माझा करार मोडला म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन; तुमच्यावर सैन्ये चालून येतील असे मी करीन; सुरक्षिततेसाठी तुम्ही तुमच्या नगरात जाल पण तेव्हा मी तुमच्यावर मरीचा रोग पसरवीन; तुमचे शत्रु तुमचा पराभव करतील.

अनुवाद 4:23

तेथे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला पवित्रकरार विसरु नका व त्याच्या आज्ञा पाळा. कुठल्याही प्रकारे कोणत्याही आकाराची मूर्ती करु नका.

अनुवाद 13:6

“तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हांला दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ति म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, ‘चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु.’ (तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकिवातही नसलेले हे दैवत असेल

अनुवाद 17:5

तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मगारा.

अनुवाद 29:18

आपल्या परमेश्वर देवापासून परावृत होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, बाई, एखादे कुटुंब किंवा कूळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विषवल्लीसमान असतात.

अनुवाद 29:25

त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला.

अनुवाद 31:20

त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या भूमीत मी त्यांना नेणार आहे. ही भूमी दुधामधाने समृद्ध आहे. तेथे त्यांची अन्नधान्याची चंगळ होईल. ते संपन्न जीवन जगतील. पण मग ते इतर दैवतांकडे वळतील व त्यांची पूजा करतील. माझ्यापासून ते परावृत होतील व कराराचा भंग करतील.

यहोशवा 7:11

इस्राएल लोकांनी पाप केले आहे. त्यांनी आज्ञाभंग करून माझ्याशी केलेला करार मोडला आहे. मी नष्ट करून टाकायाला सांगितलेल्या वस्तूपैकी काही त्यांनी ठेवून घेतल्या आहेत. त्यांनी चोरी केली आहे. खोटे बोलून त्यांनी त्या स्वत:साठी ठेवल्या आहेत.

यहोशवा 7:15

नष्ट करून टाकायला पाहिजे होती अशी वस्तू त्याच्याकडे सापडल्यास तो पकडला जाईल. तेव्हा त्या माणसाला जाळून टाकावे. तसेच त्यच्याकडे असलेले सर्व काही त्याच्याबरोबर आगीत टाकावे. या माणसाने परमेश्वराचा करार मोडून इस्राएल लोकांना कलंक लावणारी गोष्ट केली आहे.”’

यहोशवा 23:16

तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाशी केलेल्या कराराचा भंग केलात तर असे घडेल. इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुम्ही या जमीनीला मुकाल. तेव्हा त्या इतर दैवतांची चुकूनसुध्दा पूजा करु नका. तसे केलेत तर आपल्या परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल. आणि मग त्याने दिलेल्या या चांगल्या प्रदेशातून तो तुमची हकालपट्टी करेल.”

शास्ते 2:20

तेव्हा परमेश्वाराचा इस्राएल लोकांवर अतिशय संताप झाला व तो म्हणाला, “मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी माझे ऐकले नाही.

शास्ते 6:31

तेव्हा भोवतालच्या जमावाला योवाश म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेणार का? त्याला तारणार का? जो बआलाची बाजू घेईल त्याला सकाळपर्यंत मृत्युदंड दिला जावा. बआल जर खरा देव असेल तर जेव्हा लोक वेदीची मोडतोड करायचा प्रयत्न करतील तेव्हा स्वत:चे रक्षण त्याने स्वत:च करुन दाखवावे.”

2 राजे 18:12

इस्राएल लोकांनी त्यांच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही, परमेश्वराच्या कराराचा भंग केला. परमेश्वराचा सेवक मोशे याचे करार पाळले नाहीत म्हणून हे सर्व झाले. लोकांनी परमेश्वराचा करार जुमानला नाही, त्याची शिकवण ऐकली नाही.

ईयोब 31:28

ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. मी जर त्या गोष्टींची पूजा केली असती तर सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.

यिर्मया 31:32

मी त्यांच्या पूर्वजांशी केलेल्या कराराप्रमाणे तो असणार नाही. जेव्हा मी त्यांना हाताला धरुन मिसरच्या बाहेर आणले होते, तेव्हा तो करार केला होता. तेव्हा मी त्यांचा स्वामी होतो. पण त्यांनी त्या कराराचा भंग केला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यहेज्केल 16:38

मग मी तुला शिक्षा करीन. खुनी व व्यभिचाराचे पाप केलेल्या स्त्रीप्रमाणे मी तुला शिक्षा करीन. क्रोधाविष्ट व मत्सरी पतीकडून व्हावी, तशी शिक्षा तुला होईल.

होशेय 6:7

पण लोकांनी आदामासारखाच करार मोडला त्यांच्या देशातच त्यांनी माझा विश्वासघात केला.

होशेय 8:1

“रणशिंग फुंकून इषारा द्या परमेश्वराच्या घरावरील गरुडाप्रमाणे व्हा. इस्राएल लोकांनी माझा करार मोडला आहे त्यांनी माझे नियम पाळले नाहीत

इब्री लोकांस 8:9

ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून इजिप्त देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.

Interlinear

Choose Theme