Home Bibles अनुवाद 29:25 · मराठी बायबल
अनुवाद 29:25 · मराठी बायबल

त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला.

Cross references

1 राजे 9:8

हे मंदिर नामशेष होईल. ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचा असा विध्वंस का बरे केला?’

1 राजे 19:10

एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”

स्तोत्रसंहिता 106:36

ते लोक देवाच्या माणसांसाठी सापळा बनले. ते लोक ज्या देवाची प्रार्थना करीत होते त्याच देवाची पूजा करायला देवाच्या माणसांनी सुरुवात केली.

यशया 24:1

पाहा! परमेश्वर ह्या देशाचा नाश करील. ही भूमी पूर्णपणे स्वच्छ करील. परमेश्वर लोकांना बळजबरीने दूर जायला लावील.

यशया 47:6

“मी माझ्या लोकांवर रागावलो होतो ते लोक माझे आहेत पण मी रागावलो असल्याने त्यांचे महत्व कमी केले. मी त्यांना तुझ्या ताब्यात दिले. तू त्यांना शिक्षा केलीस. पण तू त्यांना अजिबात दया दाखविली नाहीस. तू वृध्दांनासुध्दा खूप मेहनत करायला लावलीस.

यिर्मया 22:8

“अनेक राष्ट्रांतील लोक या नगरीजवळून जाताना एकमेकांना विचारतील ‘यरुशलेम ह्या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले?’

यिर्मया 22:9

ह्या प्रश्र्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे असेल: ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांची सेवा केली, म्हणून देवाने यरुशलेमचा नाश केला.”

यिर्मया 31:32

मी त्यांच्या पूर्वजांशी केलेल्या कराराप्रमाणे तो असणार नाही. जेव्हा मी त्यांना हाताला धरुन मिसरच्या बाहेर आणले होते, तेव्हा तो करार केला होता. तेव्हा मी त्यांचा स्वामी होतो. पण त्यांनी त्या कराराचा भंग केला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यिर्मया 40:2

नबूजरदानला यिर्मया सापडताच, तो त्याच्याशी बोलला तो म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराने, तुझ्या देवानेच हे अरिष्ट ह्या स्थळी येणार म्हणून भाकीत केले होते.

यिर्मया 44:3

तेथे राहणाऱ्या लोकांनी पाप केल्यामुळे मी त्यांचा नाश केला. त्यांनी अनेक दैवतांना बळी अर्पण केले. त्यामुळे मला राग आला. तुमच्या लोकांनी व पूर्वजांनी, पूर्वी कधी, त्या दैवतांना पुजले नव्हते.

यिर्मया 50:7

ज्यांना माझे लोक सापडले, त्यांनी त्यांना दुखवले, आणि ते शत्रू म्हणाले, ‘आम्ही काहीही चूक केली नाही.’ त्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले. परमेश्वरच खरा त्यांचे विश्रांतिस्थान होता. त्यांच्या वडिलांनी परमेश्वर देवावरच विश्वास ठेवला.

इब्री लोकांस 8:9

ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून इजिप्त देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.

Interlinear

Choose Theme