Home Bibles अनुवाद 15:9 · मराठी बायबल
अनुवाद 15:9 · मराठी बायबल

“कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा मतलबी विचाराने कुणाला मदत नाकारु नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हांला पाप लागेल.

Cross references

निर्गम 3:7

परमेश्वर म्हणाला, “मिसरमध्ये माझ्या लोकांना कसा त्रास भोगावा लागत आहे; आणि मिसरच्या लोकांनी त्याचा कसा छळ चालविलेला आहे, हे मी पाहिले आहे; त्या लोकांच्या हाका मी ऐकल्या आहेत; लोकांचे हाल व दु:ख मला समजले आहे.

निर्गम 22:22

विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही कधीही त्रास देऊ नये;

निर्गम 22:23

तुम्ही जर त्यानां त्रास दिला तर ते मला समजेल; त्यांच्या दु:खाच्या व त्रासाच्या प्रार्थना मी ऐकेन;

अनुवाद 15:1

“दर सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करुन टाकावे.

अनुवाद 24:15

त्याला रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल.

अनुवाद 28:54

“तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले ही त्यातून सुटणार नाहीत.

अनुवाद 31:10

मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “दर सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा.

ईयोब 34:28

हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात.

स्तोत्रसंहिता 9:12

जे परमेश्वराकडे मदतीसाठी गेलेत्यांची आठवण त्याने ठेवली त्या गरीब लोकांना मदतीची याचना केली आणि परमेश्वर त्यांना विसरला नाही.

नीतिसूत्रे 4:23

तुझ्या हृदयाला काळजीपूर्वक जप. कारण तेथूनच जीवनप्रवाह वाहतात.

नीतिसूत्रे 14:21

जो शेजाऱ्याला पाण्यात पाहातो, तो पाप करतो. जर सुखी व्हायचे असेल तर त्या गरीबांशी दयाळू राहा.

नीतिसूत्रे 21:13

जर एखाद्याने गरीब लोकांना मदत करायला नकार दिला तर जेव्हा त्याला मदतीची गरज भासेल तेव्हा त्याला ती मिळणार नाही.

नीतिसूत्रे 23:6

स्वार्थी माणसाबरोबर खाऊ नका. आणि त्याला जे खास भोजन आवडते त्यापासून दूर राहा.

नीतिसूत्रे 24:9

मूर्ख माणूस ज्या गोष्टी करायच्या ठरवतो ते पाप असते. जो स्वत: ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याचा लोक तिरस्कार करतात.

नीतिसूत्रे 28:22

स्वार्थी माणसाला फक्त श्रीमंत व्हायचे असते. त्याला हे कळत नाही की तो गरीब होण्याच्या मार्गाला लागला आहे.

यिर्मया 17:10

पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने, मी माणसाच्या मनात डोकावू शकतो मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो. प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मी देऊ शकतो.

यिर्मया 34:14

मी तुमच्या पूर्वजांना म्हणालो: ‘प्रत्येक सात वर्षाच्या अखेरीला प्रत्येकाने आपल्याकडील इब्री गुलामांना मुक्त केलेच पाहिजे. तुमच्या एखाद्या इब्री बांधवाने स्वत:ला तुम्हाला विकले असेल, तर त्याने सहा वर्षे तुमची गुलामी केल्यावर तुम्ही त्याला जाऊ दिलेच पाहिजे.’ पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही वा माझ्याकडे लक्ष दिले नाही.

मत्तय 15:19

कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंत:करणातून बाहेर निघतात.

मत्तय 20:15

मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’

मत्तय 25:41

मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.

मार्क 7:21

जारकर्म, चोरी, खून,

रोमकरांस 7:8

परंतु पापाने संधी साधली आणि मजमध्ये सर्व प्रकारचा लोभ भरला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप मृतवत आहे.

याकोब 4:5

पवित्र शास्त्र सांगते त्यात काही अर्थ नाही काय? जेव्हा ते म्हणते, की देवाने जो आत्मा आमच्यात ठेवला आहे तो आमची हेव्याने वाट पाहतो.

याकोब 4:17

म्हणून जर तुम्हांला चांगले कसे करायचे हे माहीत असूनही जर ते तुम्ही करीत नाही, तर तुम्ही पाप करता.

याकोब 5:4

पहा! तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दु:ख करीत आहे आणि कापणी करणाऱ्यांचे रडणे प्रभु परमेश्वारच्या सैन्याच्या कानी पोहोंचले आहे.

याकोब 5:9

बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा! न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे.

1 पेत्र 4:9

कुरकुर न करता एकमेकांचा पाहूणचार करा.

1 योहान 3:15

जो कोणीआपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हांला माहीत आहे की, खुनी माणसाला त्याच्या ठायी असलेलेअनंतकाळचे जीवन मिळत नाही.

Interlinear

Choose Theme