Home Bibles अनुवाद 1:42 · मराठी बायबल
अनुवाद 1:42 · मराठी बायबल

“पण परमेश्वर मला म्हणाला, ‘त्यांना तेथे जाऊन युद्ध करण्यापासून परावृत कर. कारण मी त्यांच्या बाजूचा नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.’

Cross references

लेवीय 26:17

मी तुमच्याविरुद्ध होईन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.

गणना 14:41

पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हाला यश मिळणार नाही.

यहोशवा 7:8

परमेश्वरा मी माझ्या जिवाची शपथ घेतो. मला आता बोलण्यासारखे काही उरले नाही. इस्राएल शत्रूला शरण गेला आहे.

1 शमुवेल 4:2

पलिष्टी इस्राएल लोकांवर चालून जायला सज्ज झाले. अशाप्रकारे युद्धाला तोंड लागले.पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांचा पराभव केला. त्यांचे चार हजार सैनिक मारले.

1 शमुवेल 4:10

तेव्हा पलिष्ट्यांनी पराक्रमाची शर्थ करुन इस्राएल लोकांचा पाडाव केला. सर्व इस्राएली सैनिकांनी घाबरुन आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारुन पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले.

यशया 30:17

शत्रूपक्षातील एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. पाचजणांनी धमकी दिल्यास तुमचे सर्वच लोक पळून जातील. तुमच्या सैन्यातील फक्त एकच गोष्ट शिल्लक राहील. व ती म्हणजे टेकडीवरचा ध्वजस्तंभ.

यशया 59:1

हे पाहा, परमेश्वराचे सामर्थ्य तुम्हाला वाचवायला पुरेसे आहे. तुम्ही त्याची मदत मागता. ते तो ऐकू शकतो.

होशेय 9:12

पण जरी इस्राएलींनी मुले वाढविली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मी त्यांना मुलांचा वियोग घडविन. त्यांना सोडून देईन. पण त्यांना संकटाशिवाय काही मिळणार नाही.

Interlinear

Choose Theme