Home Bibles 1 शमुवेल 4:2 · मराठी बायबल
1 शमुवेल 4:2 · मराठी बायबल

पलिष्टी इस्राएल लोकांवर चालून जायला सज्ज झाले. अशाप्रकारे युद्धाला तोंड लागले.पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांचा पराभव केला. त्यांचे चार हजार सैनिक मारले.

Cross references

लेवीय 26:37

कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील व कोणी त्यांच्यामागे लागले नसतानाही पळाल्यामुळे ते अडखळून एकमेंकावर पडतील.“तुमच्या शत्रूविरुद्ध उभे ठाकण्याइतके बळ तुमच्यात नसणार.

गणना 14:45

डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

यहोशवा 7:12

म्हणून इस्राएलाच्या सैन्याने युध्दात पाठ फिरवून पळ काढला. त्यांच्या हातून चूक घडल्यामुळे ते असे वागले. त्यांचा संहारच केला पाहिजे. मी आता तुम्हाला मदत करणार नाही. मी सांगितले ते सर्व नष्ट करून टाकल्याशिवाय मी तुम्हाला साथ देणार नाही.

1 शमुवेल 17:8

गल्याथ रोज बाहेर पडे आणि इस्राएली सैनिकांना ओरडून आव्हात देई. तो म्हणे, “तुम्ही येथे येऊन युध्दासाठी का उभे आहात? तुम्ही शौलचे सेवक आहात. मी पलिष्टी आहे. तुमच्यापैकी एकाला निवडा आणि माझ्याकडे पाठवा.

1 शमुवेल 17:21

इस्राएलचे सैन्य आणि पलिष्टी समोरासमोर उभे होते.

स्तोत्रसंहिता 44:9

परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास. तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.

स्तोत्रसंहिता 79:7

त्या देशांनी याकोबाचा नाश केला त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.

स्तोत्रसंहिता 106:40

देव त्याच्या माणसांवर रागावला. देवाला त्यांचा कंटाळा आला.

विलापगीत 3:40

आपण आपली कर्मे पाहू या आणि तपासू या व नंतर परमेश्वराकडे परत जाऊ या.

Interlinear

Choose Theme