मग राजाची सगळी ज्ञानी माणसे आत आली.पण त्यांना लेख वाचता आला नाही. त्याना त्याचा अर्थ कळू शकला नाही.
Cross references
दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नामुळे चिंतेत पडून बेचैन झाला व त्याने पंडितांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली; परंतु त्यांतील कोणालाच त्या स्वप्नांच अर्थ सांगता आला नाही किंवा त्याचा उलगडा करता आला नाही.
एके दिवशी, एका क्षणात तुझ्याबाबत पुढील दोन गोष्टी घडतील. पहिली तू तुझी मुले गमावशील आणि नंतर दुसरी म्हणजे तू तुझा पती गमावशील. हो! ह्या गोष्टी तुझ्याबाबत खरोखरच घडतील. तुझी सर्व जादू आणि तुझ्या प्रभावी युक्त्या तुला वाचविणार नाहीत.
“जादूटोणा आणि चेटूक शिकण्यासाठी तू आयुष्यभर मेहनत केलीस. तेव्हा आता त्याचा उपयोग करायला सुरवात कर. कदाचित् त्या युक्त्या तुझ्या उपयोगी पडतील; कदाचित् तू कोणाला घाबरवू शकशील.
दानीएलने उत्तर दिले राजा, नबुखद्नेस्सर, तू विचारलेली गुप्त गोष्ट ज्ञानी किवा मांत्रिक अथवा खास्दी कोणीच सांगू शकणार नाही.
मी नबुखद्नेस्सर माझ्या राजवाड्यात सुखात होतो. मी यशस्वी जीवन जगत होतो.
मांत्रिक व खास्दी ह्यांना मी माझ्या स्वप्नाबद्दल सांगितले पण ते त्याचा अर्थ सांगू शकले नाहीत.
भिंतीवरचा हा लेख वाचण्यासाठी मांत्रिक व ज्ञानी माणसे येथे आली. मला, त्यांनी ह्या लेखाचा अर्थ स्पष्ट करून सांगावा,अशी माझी अपेक्षा होती. पण त्यांना ते सांगता आले नाही.