Home Bibles दानीएल 4:7 · मराठी बायबल
दानीएल 4:7 · मराठी बायबल

मांत्रिक व खास्दी ह्यांना मी माझ्या स्वप्नाबद्दल सांगितले पण ते त्याचा अर्थ सांगू शकले नाहीत.

Cross references

उत्पत्ति 41:8

दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नामुळे चिंतेत पडून बेचैन झाला व त्याने पंडितांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली; परंतु त्यांतील कोणालाच त्या स्वप्नांच अर्थ सांगता आला नाही किंवा त्याचा उलगडा करता आला नाही.

उत्पत्ति 41:24

व त्यांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली.“ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना, ज्योतिष्यांना व पंडितांना सांगितली; परंतु त्यांचा अर्थ कोणालाही सांगता आला नाही; तेव्हा त्यांचा अर्थ काय आहे?”

स्तोत्रसंहिता 37:35

मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा दुष्टमाणूस पाहिला होता.

यशया 44:25

खोटे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. पण परमेश्वर त्यांचा खोटेपणा उघड करतो. जादूटोणा करणाऱ्यांना परमेश्वर मूर्ख बनवितो. शहाण्यांनासुध्दा परमेश्वर गोंधळात टाकतो. त्यांना वाटते आपल्याला फार समजते पण देव त्यांना हास्यास्पद बनवितो. 26लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो.

यिर्मया 27:9

तेव्हा तुम्ही तुमच्या संदेष्ट्यांचे ऐकू नका. भविष्य सांगण्यासाठी जादूचा उपयोग करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. स्वप्नांचे अर्थ लावणाऱ्या लोकांचे ऐकू नका. मृतांशी बोलणाऱ्या व जादू करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. हे सर्वजण तुम्हाला “तुम्ही बाबेलच्या राजाचे दास होणार नाही’ असे सांगतात.”

यहेज्केल 31:3

अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.

दानीएल 2:1

नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षांत काही स्वप्ने पडली. त्या स्वप्नांमुळे तो काळजीत पडला व त्याची झोप उडाली.

दानीएल 2:7

ते ज्ञानी लोक पुन्हा राजाला म्हणाले,”कृपा करून बस आम्हाला तुझे स्वप्न सांग म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”

दानीएल 2:10

खास्दी राजाला म्हणाले,”राजा, तू जे मागत आहेस, ते देऊ शकणारा एकही माणूस या पृथ्वीवर नाही. अजूनपर्यंत कोणत्याही राजाने, ज्ञानी वा मात्रिक अथवा खास्दी याच्याजवळ अशा प्रकारची मागणी केलेली नाही. अगदी मोठ्या व सामर्थ्यवान राजांनीसुध्दा ज्ञानी माणसांकडे असे काही, कधीही मागितलेले नाही.

दानीएल 2:27

दानीएलने उत्तर दिले राजा, नबुखद्नेस्सर, तू विचारलेली गुप्त गोष्ट ज्ञानी किवा मांत्रिक अथवा खास्दी कोणीच सांगू शकणार नाही.

2 तीमथ्थाला 3:8

यान्रेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.

Interlinear

Choose Theme