म्हणून बाबेलमधील सर्व ज्ञानी माणसांना बोलावून आणण्याचा हुकूम दिला. का? कारण तेच मला माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकले असते.
Cross references
नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली; तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्याला समजले.
काही लोक “काय करावे ते ज्योतिषी व जादूटोणा करणारे यांना विचारा” असे म्हणतात. (ते ज्योतिषी व जादूटोणा करणारे कुजबुजतात व आपल्याला गुपित समजते असे लोकांना वाटावे म्हणून पक्षांप्रमाणे बोलतात.) पण मी सांगतो की तुम्ही मदतीसाठी देवाला हाक मारावी. ते ज्योतिषी आणि जादूटोणा करणारे मृतांची मदत घेतात. सजीवांनी मृतांची मदत का घ्यावी?
“जादूटोणा आणि चेटूक शिकण्यासाठी तू आयुष्यभर मेहनत केलीस. तेव्हा आता त्याचा उपयोग करायला सुरवात कर. कदाचित् त्या युक्त्या तुझ्या उपयोगी पडतील; कदाचित् तू कोणाला घाबरवू शकशील.
देवाने ह्या चौघांना सुज्ञपणा व निरनिराव्व्या प्रकारचे साहित्य व विज्ञान शिकण्याची क्षमता दिली होती. दानीएलला तर सर्व प्रकारच्या दृष्टांन्ताबद्दल व स्वप्नांबद्दल समजू शके.
म्हणून त्याने त्याच्या ज्ञानी माणसांना बोलावून घेतले. हे ज्ञानी स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आणि भविष्यात काय घडेल, हे सांगण्यासाठी मंत्र-तंत्र करीत व ताऱ्यांचे निरीक्षण करीत. ह्या लोकांनी राजाला काय स्वप्न पडले आहे, ते सांगावे, अशी राजाची इच्छा होती. मग ते लोक राजाच्या समोर येऊन उभे राहिले.
मग राजाने दानीएलला राज्यात महत्वाचे अधिकारपद दिले. त्याने त्याला बहुमोल भेटी दिल्या. राजांने बाबेलच्या परगण्याची सत्ता दानीएलकडे सोपविली. त्याने सर्व ज्ञानी माणसांचा प्रमुख म्हणून दानीएलची नेमणूक केली.
पण खोड व मुळे जमिनीत तशीच; राहू द्यात. त्याभोवती लोखंड व कोसे यांची जाळी लावा. खोड व मुळे तेथेच राहातील. त्यांच्याभोवती गवत कढेल ते खोड व ती मुळे तेथेच झाडा-झुडुपांमध्ये वन्य पशूंबरोबर राहातील, व दवाने भिजतील.
तुझ्या राज्यात पवित्र दैवतांचा आत्मा ज्याच्यामध्ये वास करतो, असा एक माणूस आहे. तुझ्या वडिलांच्या काळात, ह्या माणसाने त्याला रहस्ये समजतात हे दाखवून दिले होते. तो अतिशय चलाख व सुज्ञ असल्याचे सिध्द झाले होते. ह्या गोष्टींत तो देवतासमान आहे. तुझ्या आजोबांनी, नबुखद्नेस्सर राजाने, त्याला सर्व ज्ञानी माणसांचा प्रमुख म्हणून नेमले होते. मांत्रिकांवर व खास्द्यांवर त्याचा प्रभाव होता.