मिसरचा सोन्या चांदीचा खजिना व सर्व संपत्ती त्याला मिळेल. लूबी व कूशी त्याला मानतील (त्याची आज्ञा पाळतील).
Cross references
मग हे सर्व तुमचे दास (म्हणजे मिसरचे लोक) माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, “तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग मी त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.”‘
तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून दहाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती.
शिशककडे 12,000 रथ, 60,000 घोडेस्वार आणि अगणित पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुकृीव कुशी हे लोक होते.
घोडेस्वारांनो, चढाई करा. सारथ्यांनो, रथ वेगाने हाका. शूर सैनिकांनो, कूच करा. कूश व फूट येथील सैनिकांनो, ढाली सांभाळा. लूदच्या सैनिकांनो, धनुष्याचा उपयोग करा.
मिसरविरुद्ध तलवार उठेल. मिसरच्या पतनाच्या वेळी कुश देशातील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. बाबेलचे सैन्य मिसरच्या लोकांना कैदी करुन नेईल. मिसरचा पाया उखडला जाईल.
पारस, कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील. 5पारस, कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील. त्यांच्याजवळ ढाली असतील आणि त्यांनी शिरस्त्राणे घातलेली असतील.
कूश व मिसर यांनी तिला खूप बळ दिले पूट व लूब ह्यांनी तिला मदत केली.