दानीएल 11:42 · मराठी बायबल
पुष्कळ देशांना तो आपले बळ दाखवील. तो किती बलवान आहे, हे मिसरलासुध्दा कळेल.
Cross references
यहेज्केल 29:14
मिसरच्या कैद्यांना मी परत आणीन. मी त्यास त्यांच्या जन्मभूमीत पथ्रोस देशात परत आणीन. पण त्यांचे राज्य महत्वाचे राहणार नाही.
जखऱ्या 10:10
मी त्यांना मिसरमधून व अश्शूमधून परत आणीन मी त्यांना गिलादच्या भागात आणीन. पण तेथे पुरेशी जागा नसल्याने मी त्यांना लबानोनमध्ये राहू देईन.”
जखऱ्या 14:17
पृथ्वीवरील कोणत्याही कुटुंबातील लोक यरुशलेमला प्रभुराजाची, सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करायला गेले नाहीत तर परमेश्वर त्यांच्या प्रदेशात पाऊस पाडणार नाही.
प्रकटीकरण 11:8
त्या साक्षीदारांची शरीरे मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडतील.त्या शहरांचे नाव सदोम आणि इजिप्त असे आहे. शहरांच्या या नावांना विशेष अर्थ आहे. या शहरातच आपल्या प्रभूलावधस्तंभावर मारण्यात आले.