तो येताच त्याच्या राज्याचे तुकडे पडतील जगाच्या चार भागांत त्याच्या राज्याचे विभाजन होईल.त्या राजाची मुले किंवा नातवंडे ह्यांच्यात त्याचे राज्य विभागले जाणार नाही. त्याच्यासारखी त्याच्या राज्याला सत्ता मिळणार नाही का? कारण त्याचे राज्य हिसकावून घेतले जाईल व इतरांना दिले जाईल.
Cross references
मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा दुष्टमाणूस पाहिला होता.
आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते. आपली सगळी संकटे निष्कारणच असतात. आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्यालामाहीत नसते.
काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता आणि संपत्ती त्यांचे रक्षण करील परंतु ते लोक मूर्ख आहेत.
मी देवाच्या मंदिरात गेलो आणि नंतर मला कळले.
मी जे अपार कष्ट केले त्याचा मी किरस्कार करू लागलो. मी खूप कष्ट केले. परंतु त्या कष्टांनी मी जे मिळवले ते माझ्यानंतर जे लोक राहतील त्याना मिळणार आहे. मी त्या गोष्टी माझ्याबरोबर नेऊ शकणार नाही.
एखाद्याचे कुटुंब नसेल. त्याला मुलगा किंवा भाऊ नसेल. परंतु तो खूप काबाडकष्ट करत राहील. त्याच्या जवळ जे आहे त्यात त्याला कधीही समाधान वाटणार नाही. आणि तो इतके करतो की तो जरा थांबून स्वत:ला कधीही विचारत नाही, “मी इतके कष्ट का करीत आहे? मी आयुष्याचा उपभोग का घेत नाही?” ही देखील एक अतिशय वाईट आणि अविचारी गोष्ट आहे.
पण अशा रीतीने त्या लोकांना देशाबाहेर हाकलल्यावर मला त्यांची कणव येईल. मी प्रत्येक कुटुंब परत त्यांच्या देशात आणीन आणि त्यांची जमीन परत देईल.
पण जर एखाद्या राष्ट्राने माझा आदेश मानला नाही, तर त्या राष्ट्राचा मी समूळ नाश करीन. त्या राष्ट्राला मेलेल्या झाडाप्रमाणे उपटीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
मी राष्ट्र व राज्य ह्याबद्दल बोलण्याची वेळ येण्याचा संभव आहे. मी कदाचित् त्या राष्ट्राला वर ओढीन असे म्हणेन वा त्या राष्ट्रांला खाली खेचून त्या राष्ट्राचा वा राज्याचा नाश करीन असेही म्हणेन.
ज्या दरीत प्रेते व राख टाकली जाते, ती परमेश्वराला पवित्र वाटेल. ह्यात पूर्वेकडच्या किद्रोन दरीपासून घोडे दाराच्या कोपऱ्यापर्यंतच्या पठाराचा समावेश असेल. हा सर्व प्रदेश परमेश्वराला पवित्र वाटेल. यरुशलेमचा पुन्हा कधीही विध्वंस केला जाणार नाही वा तिचा नाश होणार नाही.”
“यिर्मया, बारुखला असे सांग की परमेश्वर म्हणतो, ‘मी बांधलेले मीच तोडून टाकीन. मी पेरलेले मीच उपटून टाकीन. मी सर्व यहूदात असेच करीन.
दानीएल म्हणाला “मला रात्री दृष्टान्त झाला.दृष्टान्तत दानीएलने चारी दिशांनी वारा वाहात होता. त्या वाऱ्याने समुद्र खवळला.
“ह्यानंतर मी पाहिले मला माझ्यासमोर तिसरा प्राणी दिसला. तो चित्याप्रमाणे होता. त्याच्या पाठीवर चार पंख होते. ते पक्ष्यांच्या पंखासारखे होते. त्याला चार डोकी होती. त्याला सत्ता गाजवायचा अधिकार दिला होता.
“मी त्या शिंगाबद्दल विचार करीत असतानाच, त्या शिंगामध्ये आणखी एक शिंग उगवले. ते लहान होते, त्या शिंगावर माणसाच्या डोव्व्याप्रमाणे डोळे व तोंड होते. ते तोंड प्रौढी मिरवीत होते. त्या लहान शिंगाने तीन इतर शिंगे उपटून टाकली.चवथ्या प्राण्याचा न्यायनिवाडा
मग बोकड खूपच शक्तिशाली झाला, पण तो बलिष्ठ होताच त्याचे मोठे शिंग मोडले व त्या जागी चार शिंगे उगवली. ती सहज दिसण्यासारखी होती. त्यांची टोके चार दिशांना होती.
ते मोडले आणि त्या जागी चार शिंगे उगवली. ती चार शिंग म्हणजे चार राज्ये होत, पहिल्या राजाच्या राष्ट्रातून ही चार राज्ये निर्माण होतील. पण पहिल्या राजाएवढी ती शक्तिशाली असणार नाहीत.
परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, ‘आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही.
पण देव त्याला म्हणतो, “मूर्खा, जर आजा तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’