Home Bibles आमोस 7:2 · मराठी बायबल
आमोस 7:2 · मराठी बायबल

टोळांनी देशातील सर्व गवत खाल्ले. त्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हाला क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही तो फारच दुबळा आहे.”

Cross references

निर्गम 10:15

त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरमधील कुठल्याच झाडांझुडपांवर एकही पान राहिले नाही.

निर्गम 32:11

परंतु काकुळतीने विनंती करुन मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, “परमेश्वरा, तुझ्या रागाने तुझ्या लोकांचा नाश न होवो; तू तुझ्या महान शक्तीने व सामर्थ्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस

निर्गम 34:9

“परमेश्वर तू जर मजवर खूष असशील तर कृपा करून आमच्याबरोबर चाल! हे लोक ताठमानेचे आहेत हे मला माहीत आहे; परंतु आम्ही केलेल्या पापाबद्दल तू आम्हाला क्षमा कर! आणि तुझे लोक म्हणून आमचा स्वीकार कर.”

गणना 14:17

“प्रभू, म्हणून आता तू तुझी शक्ती दाखव. तू, ‘मी ती दाखवीन’ असे म्हणाला होतास त्याप्रमाणे दाखव.

गणना 14:19

आता तुझे दिव्य प्रेम या लोकांना दाखव. त्यांच्या पापाची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही क्षमा कर.”

स्तोत्रसंहिता 12:1

परमेश्वरा, मला वाचव! सर्व चांगले लोक आता गेले आहेत. आता पृथ्वीवर खराखूरा भक्त उरलेला नाही.

स्तोत्रसंहिता 44:24

देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस? तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का?

यशया 37:4

सेनापतीने सांगितलेल्या गोष्टी, परमेश्वर तुमचा देव कदचित् ऐकेल. अश्शूरच्या राजाने प्रत्यक्षातील देवाबद्दल वाईटसाईट बोलण्यास आपल्या सेनापतीला पाठविले आणि परमेश्वराने, तुमच्या देवाने. ती निंदा ऐकली. इस्राएलमध्ये राहिलेल्या थोड्या लोकांसाठी प्रार्थना करा.”

यशया 51:19

दोन-दोनच्या गटाने यरूशलेमवर संकटे आली चोरी आणि नुकसान, भूक आणि युध्द.तू संकटात असताना तुला कोणीही मदत केली नाही. कोणी तुझ्यावर दया केली नाही.

यिर्मया 14:7

या गोष्टींना आम्हीच जबाबदार आहोत, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही आमच्याच पापाचे भोग भोगत आहोत. परमेश्वरा, तुझे नाव राखण्यासाठी आम्हाला मदत कर. कारण आम्ही तुझ्याशी खूप वेळा प्रतारणा केली, हे आम्हाला कबूल आहे. आम्ही तुझ्याशी पापाचरण केले,

यिर्मया 14:20

परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हाला जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझे अपराध केले.

यिर्मया 42:2

ते सर्वजण यिर्मयाला म्हणाले, “यिर्मया, कृपया आमची विनंती मान्य कर. यहूदाच्या कुळातील वाचलेल्या सर्व लोकांसाठी परमेश्वराकडे तुझ्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. यिर्मया, आमच्यापैकी फारच थोडे वाचले आहेत, हे तुला दिसतेच आहे. एकेकाळी आम्ही संख्येने जास्त होतो.

यहेज्केल 9:8

ती माणसे लोकांना मारायला गेली असताना, मी तेथेच थांबलो. मी वाकून नमस्कार केला आणि आक्रोश करुन म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, यरुशलेमवरचा तुझा राग दाखविण्यासाठी इस्राएलात शेष राहिलेल्या प्रत्येकाला तू ठार मारणार आहेस का?”

यहेज्केल 11:13

मी भविष्यावाणी संपवताच बनायाचा मुलगा पलट्या मेला. मी जमिनीवर पडलो. डोके टेकवून मी मोठ्याने ओरडलो, “हे परमेश्वरा, माझ्या प्रभु, तू इस्राएलच्या अवशेषाचा पूर्ण विध्वंस करणार आहेस!”

दानीएल 9:19

परमेशवरा, माझे ऐक आम्हाला क्षमा कर. परमेश्वरा, आमच्याकडे लक्ष दे आणि आमच्यासाठी काहीतरी कर.आता वाट पाहू नकोस! आताच काहीतरी कर. तुझ्या चांगल्यासाठी काहीतरी कर. परमेश्वरा तुझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या नगरीसाठी आणि तुझ्या लोकांसाठी काहीतरी आताच कर!”

आमोस 7:5

पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, मी तुझी करूणा भाकतो याकोब जगू शकणार नाही तो खूपच लहान आहे.”

जखऱ्या 4:10

लोकांना लहानशा आरंभाची लाज वाटणार नाही. आणि जेव्हा जरुब्बाबेल ओळंबा घेऊन पूर्ण बांधून झालेल्या मंदिराची मोजमापे घ्याला लागेल व तपासून पाहील, तेव्हा त्यांना खरोखरीच आनंद वाटेल. तू पाहिलेल्या दगडाच्या सात बाजू म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्व काही पाहतात.”

याकोब 5:15

विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील व प्रभु त्याला उठविल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभु त्याची क्षमा करील.

प्रकटीकरण 9:4

टोळांना सांगण्यात आले होते की त्यांनी गवताला, रोपांनाकिंवा झाडांना हानि पोहचवू नये. ज्या लोकांच्या कपाळावर देवाचा शिक्का मारण्यात आला नसेल त्यांनाच चावण्यास त्यांनासांगण्यात आले होते.

Interlinear

Choose Theme