Home Bibles 2 पेत्र 3:4 · मराठी बायबल
2 पेत्र 3:4 · मराठी बायबल

आणि म्हणतील, “ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या अभिवचनाचे काय झाले? आम्हाला ते जाणून घ्यायचे आहे, कारण आमचेपूर्वज मेल्यापासून प्रत्येक गोष्ट जगाच्या निर्मितीच्या पासून जशी चालत आली तशीच ती आजसुद्धा घडत आहे.”

Cross references

उत्पत्ति 19:14

म्हणून मग लोट बाहेर गेला व आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, व हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले.

उपदेशक 1:9

सुरुवातीपासून गोष्टी जशा होत्या तशाच त्या राहतात. जे आता पर्यंत करण्यात आले तेच करण्यात येणार. या आयुष्यात नवीन असे काहीच नसते.

उपदेशक 8:11

लोकांना त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींबद्दल कधीच ताबडतोब शिक्षा केली जात नाही. त्यांना शिक्षा देण्यास विलंब लागतो आणि त्यामुळे इतरांनाही वाईट गोष्टी करण्याची इच्छा होते.

यशया 5:18

त्या लोकांकडे पाहा लोक दोरांनी गाड्या खेचून नेतात तसे ते आपले गुन्हे व पापे वाहून नेत आहेत.

यिर्मया 5:12

“हे लोक परमेश्वराबद्दल खोटे बोलले. ते म्हणाले आहेत, ‘परमेश्वर आम्हाला काही करणार नाही. आमचे काही वाईट होणार नाही. आमच्यावर हल्ला झालेला आम्ही कधी पाहणार नाही. आम्ही कधी उपाशी राहणार नाही.’

यिर्मया 17:15

यहूदातील लोक मला सतत प्रश्र्न विचारतात. ते विचारतात, “यिर्मया, परमेश्वराच्या संदेशाचे काय? तो खरोखरीच खरा ठरतो का ते पाहू या.”

यहेज्केल 11:3

ते म्हणतात, ‘आपण आपली घरे पुन्हा लवकरच बांधू. भांड्यातील मांसाप्रमाणे आपण येथे सुरक्षित आहोत.’

यहेज्केल 12:22

“मानवपुत्रा, इस्राएल देशाबद्दल लोक पुढील गीत का म्हणतात?संकटे लवकर येणार नाहीत.दृष्टान्त खरे होणार नाहीत.

मलाखी 2:17

तुम्ही चुकीच्या गोष्टी शिकविल्या त्यामुळे परमेश्वराला फार दु:ख झाले. दुष्कृत्ये करणारे लोक देवाला आवडतात, असे तुम्ही शिकविले. देवाला हे लोक चांगले वाटतात, असे तुम्ही सांगितले. दुष्कृत्ये करणाऱ्यांना देव शिक्षा करीत नाही, असे तुम्ही शिकविले.

मत्तय 24:28

जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.

मत्तय 24:48

“पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल?

मार्क 10:6

परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरूष व स्त्री असे निर्माण कोले.

मार्क 13:19

कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल.

लूक 12:45

पण जर तो नोकर मनात म्हणतो, “माझा मालक येण्यास फार विलंब लावतो.’ व तो त्याच्या स्त्री व पुरुष नोकरांना मारहाण करतो व खाण्यापिण्यास सुरुवात करतो.

1 थेस्सलनीकाकरांस 2:19

शेवटी, जेव्हा आपला प्रभु येशू दुसऱ्यांदा येईल, तेव्हा त्याच्यासमोर उभे राहू तेव्हा आमची आशा, किंवा आनंद किंवा मुकुट काय असेल, ज्याचा आम्हांला अभिमान वाटेल? ते तुम्हीच नाही का?

प्रकटीकरण 3:14

“लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही:“जो आमेनआहे, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.

Interlinear

Choose Theme