“पण इस्राएल, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन. ते राष्ट्र. तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला अडचणीत आणेल.’ सर्वशक्तिमान परमेश्वर देव हे सर्व बोलला.
Cross references
तुमची उत्तरेकडची सीमा भूमध्यसमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे जाईल (लेबानान मध्ये).
शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्या - पिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला.
लेबो-हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंतची इस्राएलची भूमी यराबामने पुन्हा संपादन केली. गथ-हेफेर मधला संदेष्टा अमित्तयचा मुलगा योना याला इस्राएलच्या परमेश्वराने सांगितले त्या प्रमाणेच हे घडले.
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.
होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले. इस्राएल लोकांना त्याने कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदीलोकांच्या नगरात ठेवले.
परमेश्वर अश्शूर देशाचा उपयोग यहुदाला शिक्षा करण्यासाठी करून घेईल. अश्शूर देशाला भाडोत्री म्हणून घेऊन त्याचा उपयोग वस्तऱ्याप्रमाणे केला जाईल. देव जणू काही ह्या वस्तऱ्याचा उपयोग करून यहुदाचे डोके, पाय भादरेल आणि त्याची हजामतही करील.
कारण तो मुलगा ‘आई-बाबा’ असे बोलायला लागण्यापूर्वीच देव दमास्कसची व शोमरोनची सर्व धनसंपत्ती काढून अश्शूरच्या राजाला देईल.”
देव म्हणेल, “मी अश्शूरचा उपयोग छडीप्रमाणे करीन. रागाच्या भरात मी अश्शूरकडून इस्राएलला शिक्षा करीन.
इस्राएलच्या वारसांनो हा परमेश्वराचा संदेश आहे. “दूरवरच्या राष्ट्राला मी, तुमच्यावर हल्ला करण्यासाठी लवकरच आणीन. ते शक्तिशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील लोक तुम्हाला माहीत नसणारी भाषा बोलतात. ते काय बोलतात ते तुम्ही समजू शकणार नाही.
“जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला भूमध्य समुद्रापासून, हेथलोनच्या बाजूने हमाथकडे रस्ता वळतो तेथपर्यंत आणि पुढे सदाद,
शोमरोनमधील लोक बेथ:आवेन येथील वासरांची पूजा करतात. ते लोक अक्षरश:रडतील. ते याजकही खरोखरी रडतील. का? कारण त्यांची सुंदर मूर्ती नाहीशी झाली. ती दूर नेली गेली.