Home Bibles 2 राजे 14:25 · मराठी बायबल
2 राजे 14:25 · मराठी बायबल

लेबो-हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंतची इस्राएलची भूमी यराबामने पुन्हा संपादन केली. गथ-हेफेर मधला संदेष्टा अमित्तयचा मुलगा योना याला इस्राएलच्या परमेश्वराने सांगितले त्या प्रमाणेच हे घडले.

Cross references

उत्पत्ति 14:3

या सर्व राजांनी आपले सैन्य सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमविले. (हे खोरे म्हणजे आताचा क्षार समुद्र)

गणना 13:21

म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन वाळवंटापासून रहोब आणि लेबोहामाथपर्यंतच्या प्रदेशाचा शोध घेतला.

गणना 34:7

तुमची उत्तरेकडची सीमा भूमध्यसमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे जाईल (लेबानान मध्ये).

गणना 34:8

होर पर्वतावरुन ती लेबो-हमासला जाईल व तेथून सदादला.

अनुवाद 3:17

पश्चिमेला यार्देन नदी. उत्तरेला गालिल सरोवर, पूर्वेला पिसागाची उतरण व त्याच्या तळाशी दक्षिणेला मृत समुद्र म्हणजेच क्षार समुद्र.

यहोशवा 19:13

त्यानंतर ती सीमा पूर्वेकडे गथ-हेफेर आणि इजा-कासीनकडे गेली. आणि ती रिम्मोन येथे थांबली त्यानंतर ती वळण घेऊन नेया कडे गेली.

1 राजे 8:65

शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्या - पिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला.

2 राजे 10:32

याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला.

2 राजे 13:25

मृत्यूपूर्वी हजाएलने योवाशचे वडील यहोआहाज ह्यांच्या कडून युध्दात काही नगरे हस्तगत केली होती. पण योवाशने ती आता हजाएलचा मुलगा बेन-हदाद याच्याकडून परत मिळवली. योवाशने बेनहदादचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलची नगरे जिंकून घेतली.

यहेज्केल 47:16

बेरोथा, सिब्राईम (जे दिमिष्क व हमाथ यांच्या सीमेवर आहे.) हासेर - हत्तीकोन (जे हौरानच्या सीमेवर आहे.) हासेर - हत्तीकोने (जे हौरानच्या सीमेवर आहे.) येथपर्यंत.

आमोस 6:14

“पण इस्राएल, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन. ते राष्ट्र. तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला अडचणीत आणेल.’ सर्वशक्तिमान परमेश्वर देव हे सर्व बोलला.

योना 1:1

अमित्तयाचा मुलगा योना ह्याच्याशी परमेश्वर बोलला. आणि म्हणाला,

मत्तय 12:39

येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी प्रामाणीक नाहीत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हांला मिळणार नाही.

मत्तय 16:4

दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्यशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.

Interlinear

Choose Theme