Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 9:8 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 9:8 · मराठी बायबल

शौल जमिनीवरुन उठला. त्याने डोळे उघडले, पण त्याला काहीच दिसेना. म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते, त्यांनी त्याचा हात धरुन त्याला दिमिष्क शहरात नेले.

Cross references

उत्पत्ति 19:11

त्या दोन पुरुषांनी दारा बाहेरील लोकांस आंधळे केले; म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे ते सर्व तरुण व म्हातारे आंधळे झाले, त्यामुळे अखेर पर्यंत त्यांना घराचे दार सापडलेच नाहीं.

निर्गम 4:11

मग परमेश्वर त्याला म्हणाला, “माणसाचे तोंड कोणी केले? माणसाला बहिरा, मुका, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मीच की नाही? मी ‘याव्हे’ आहे! होय ना?

2 राजे 6:17

आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “परमेश्वर, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल.”परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलीशाच्या भोवती अग्रीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.

प्रेषितांचीं कृत्यें 9:18

लागलीच खपल्यासारखे काही तरी शौलाच्या डोळ्यांवरुन खाली पडले, आणि त्याला पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला.

प्रेषितांचीं कृत्यें 13:11

आता तुला देवाने स्पर्श करताच तू आंधळा होशील. भर दिवसाच्या उन्हातही तुला काही काळ दिसणार नाही.”मग अलीमसाठी सर्व काही अंधकारमय झाले, चाचपडत तो इकडेतिकडे फिरु लागला. कोणीतरी मदतीला घेऊन त्याचा हात धरुन जाण्यासाठी प्रयत्न करु लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 22:11

त्या प्रकाशामुळे मला काही दिसेनासे झाले. तेव्हा माइया सोबत्यांनी मला हाताला धरुन नेले आणि मी दिमिष्कला पोहोंचलो.

Interlinear

Choose Theme