Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 9:18 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 9:18 · मराठी बायबल

लागलीच खपल्यासारखे काही तरी शौलाच्या डोळ्यांवरुन खाली पडले, आणि त्याला पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 2:38

पेत्र त्यांना म्हणाला, “तुमची ह्रदये व जीविते बदला आणि येशू रिव्रस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

प्रेषितांचीं कृत्यें 2:41

मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये तीन हजार लोकांची भर पडली.

प्रेषितांचीं कृत्यें 13:12

जेव्हा राज्यपालाने ते पाहिले (सार्ग्य पौल) त्याने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.

प्रेषितांचीं कृत्यें 13:37

पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठविले, त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 22:16

मग आता, कशाची वाट पाहतोस? ऊठ, आणि बाप्तिस्मा घे व तुझी पाप धुवून टाक. येशूवर विश्वास ठेवून हे कर.’

2 करिंथकरांस 3:14

पण त्यांची मने मंद करण्यात आली होती. कारण आजपर्यंत तोच पडदा (आवरण) राहतो, जेव्हा जुना करार वाचला जातो. तो हटवण्यात आलेला नाही. कारण केवळ ख्रिस्तामध्येच तो बाजूला घेतला जाईल.

2 करिंथकरांस 4:6

कारण देव, जो म्हणाला, “अंधारातून प्रकाश होवो.” त्याने तो प्रकाश, आमच्या अंत:करणात ख्रिस्ताच्या चेहेऱ्यात देवाच्या गौवाच्या ज्ञानात दाखवावा.

Interlinear

Choose Theme