Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 9:41 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 9:41 · मराठी बायबल

त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने विश्वासणाऱ्यांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलाविले. त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती!

Cross references

उत्पत्ति 45:26

त्यांनी आपल्या बापास सांगितले, “बाबा! बाबा! तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी आहे.” हे ऐकून त्यांच्या बापाला भोवळ आली.त्यांच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना!

1 राजे 17:23

एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्याला सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा मुलगा जिवंत आहे.”

2 राजे 6:7

अलीशा म्हणाले, “घे ते पाते उचलून.” मग त्या माणसाने पुढे होऊन पाते उचलले.

ईयोब 29:13

मृत्युपंथाला लागलेला माणूस मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे.

स्तोत्रसंहिता 146:9

परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो. परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.

मार्क 1:31

तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले. आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली.

लूक 7:12

तो गावाच्या वेशीजवळ आला असता, एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरीता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. आणि ती विधवा होती. आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते.

लूक 7:15

तेव्हा येशू म्हणाला, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!” आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले.

प्रेषितांचीं कृत्यें 3:7

मग पेत्राने त्या माणासाचा उजवा हात धरला व त्याला उठविले. आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ति आली.

प्रेषितांचीं कृत्यें 6:1

अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते. पण याचवेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहूदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की, अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो, तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते.

प्रेषितांचीं कृत्यें 20:12

त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.

Interlinear

Choose Theme