Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 3:4 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 3:4 · मराठी बायबल

पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले. “आमच्याकडे पाहा!”

Cross references

लूक 4:20

मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता.

योहान 5:6

येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले, तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले. “तुला बरे व्हावयाला पाहिजे का?”

योहान 11:40

येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

प्रेषितांचीं कृत्यें 3:12

जेव्हा पेत्राने हे पाहिले, तो लोकांना म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, ह्यामुळे तुम्हांला आश्चर्य का वाटत आहे? तुम्ही आमच्याकडे असे पाहात आहात की जणू काय आमच्या सामर्थ्यानेच हा मनुष्य चालू लागला आहे. तुम्हांला असे वाटते का की, आमच्या चांगुलपणामुळे असे घडले?

प्रेषितांचीं कृत्यें 11:6

मी त्याच्या आतमध्ये पाहिले. मी त्यात पाळीव आणि जंगली प्राणी पाहीले. सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी मी त्यात पाहिले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:9

पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे पाहिले. पौलाने पाहिले की, देव त्याला बरे करील असा त्या मनुष्याचा विश्वास झाला आहे.

Interlinear

Choose Theme