Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 28:1 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 28:1 · मराठी बायबल

जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले. तेव्हा आम्हांना कळले की, त्या बेटाचे नाव माल्ता असे आहे.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 16:10

पौलाला हा दृष्टान्त झाल्यावर आम्ही तेथे जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी यासाठी देवाने आम्हांला बोलाविले. हे आम्ही समजलो. आणि लगेच मासेदोनियाला जाण्याच्या तयारीला लागलो.

प्रेषितांचीं कृत्यें 27:26

परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरुन थांबावे लागले.”

प्रेषितांचीं कृत्यें 27:39

दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही. परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरविले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:44

बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्व जण सुखरुपपणे भूमीवर पोहोंचले.

Interlinear

Choose Theme