Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 27:41 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 27:41 · मराठी बायबल

परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले. तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.

Cross references

1 राजे 22:48

राजा यहोशाफाटने काही मालवाहू गलबते बांधली. त्यात त्याचा हेतू ओफीरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.

2 इतिहास 20:37

पुढे अलियेजर ने यहोशाफाटविरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा मुलगा. तो म्हणाला, “यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील.” आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.

यहेज्केल 27:26

तुझ्या नविकांनी तुला खोल समुद्रात नेले. पण पूर्वेचा जोरदार वारा तुझा समुद्रातील जहाजाचा नाश करील.

यहेज्केल 27:34

“पण आता तू समुद्र व त्याचे खोल पाणी यामुळे फुटलीस. तुझा माल व माणसे समुद्रात पडली.

प्रेषितांचीं कृत्यें 27:17

जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सूर्तीनावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले. तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:26

परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरुन थांबावे लागले.”

2 करिंथकरांस 11:25

तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व एक दिवास घालविला.

Interlinear

Choose Theme