Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 25:21 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 25:21 · मराठी बायबल

सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा मी आज्ञा केली की, कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्याला तुरुंगातच ठेवावे.”

Cross references

लूक 2:1

त्या दिवसात कैसर औगुस्तकडून हुकुम झाला की, रोमन जगातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे.

प्रेषितांचीं कृत्यें 25:10

पौल म्हणाला, “मी आता कैसराच्या न्यायासनासमोर उभा असून त्याच्यासमोर माझा न्यायनिवाडा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. मी यहूदी लोकांचा काहीही अपराध केलेला नाही, हे आपणांस चांगले माहीत आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 26:32

अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.”

2 तीमथ्थाला 4:16

पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये.

Interlinear

Choose Theme