Home Bibles 2 शमुवेल 3:24 · मराठी बायबल
2 शमुवेल 3:24 · मराठी बायबल

तेव्हा यवाब राजाकडे आला आणि म्हणाला, “हे आपण काय केलेत? अबनेर येथे आलेला असताना तुम्ही त्याला तसेच जाऊ दिलेत! असे का?

Cross references

उत्पत्ति 12:18

तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला. “तू माझ्याबाबत फार वाईट गोष्ट केलीस, साराय तुझी बायको आहे, हे तू मला सांगितले नाहीस का?

गणना 23:11

बालाक बलामला म्हणाला, “तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंविरुद्ध बोलण्यासाठी मी तुला येथे आणले. पण तू तर त्यांना आशीर्वाद दिलास.”

2 शमुवेल 3:8

या बोलण्याचा अबनेरला संताप आला. तो म्हणाला, “शौलशी आणि त्याच्या घराण्याशी मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. दावीदाच्या हातून मी तुमचा पराभव होऊ दिला नाही. मी विश्वासघात केला नाही.पण आता तू मला या बाईच्या संदर्भात दूषण देत आहेस.

2 शमुवेल 3:39

त्याच दिवशी राजा म्हणून माझा राज्याभिषेक झाला. सरुवेच्या मुलांचे हे वर्तन मला फार त्रासदायक झाले आहे. परमेश्वर त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना तसेच शासन करो.”

2 शमुवेल 19:5

यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्याला म्हणाला, “आपल्या सेवकांना तू आज मान खाली घालायला लावली आहेस. तुझ्या सेवकांनी तुझा जीव वाचवला. तुझी मुले, मुली, बायका दासी यांचे प्राण वाचवले.

योहान 18:35

पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझे लोक आणि तुझ्या मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले, तू काय केले आहेस?”

Interlinear

Choose Theme