Home Bibles 2 शमुवेल 3:16 · मराठी बायबल
2 शमुवेल 3:16 · मराठी बायबल

पालटीयेल हा मीखलचा नवरा. तो तिच्यामागोमाग बहूरीम पर्यंत रडतरडत गेला. पण अबनेरने त्याला परत जाण्यास सांगितले तेव्हा तो मागे फिरला.

Cross references

2 शमुवेल 16:5

पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी. तो दावीदाला पुन्हा पुन्हा शिव्याशाप देत चालला होता.

2 शमुवेल 17:18

पण एका मुलाने योनाथान आणि अहीमास यांना पाहिलेच. हे अबशालोमला सांगायला तो धावत निघाला. योनाथान आणि अहीमास तेथून चटकन् निघाले. ते बहूरीम येथे एकाच्या घरी पोचले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती. त्यात उतरुन ते लपले.

2 शमुवेल 19:16

गेराचा मुलगा शिमी हा बन्यामीनच्या घराण्यातील होता. तो बहूरीम येथे राहात असे. यहूदातील लोकांसह राजाची भेट घ्यायला तो लगबगीने आला.

2 शमुवेल 19:17

बन्यामीनच्या वंशातील हजार माणसेही त्याच्याबरोबर आली. शौलाच्या घराण्यातील सेवक सीबा हाही आला. आपले पंधरा मुलगे आणि वीस नोकर यांनाही त्याने बरोबर आणले. राजा दावीदाला भेटायला हे सर्व यार्देन नदीजवळ तात्काळ पोहोंचले.

2 शमुवेल 23:31

अबी-अलबोन अर्वाथी, अजमावेथ बरहूमी,

1 राजे 2:8

“गेराचा मुलगा शिमी झकडे आसपासच आहे हे लक्षात ठेव. तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की मी त्याला ठार करणार नाही.

नीतिसूत्रे 9:17

पण ती (मूर्खता) म्हणते, “जर तुम्ही पाणी चोरले तर ते पाणी तुमच्या पाण्यापेक्षा अधिक चवदार लागते. जर तुम्ही भाकर चोरली तर ती तुम्ही केलेल्या भाकरीपेक्षा अधिक चवदार लागते.”

Interlinear

Choose Theme