त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या.
Cross references
तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरुद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस; अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.
सीनाय पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा धूर पर्वतातून वर आला. परमेश्वर पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून असे झाले; आणि सर्व सीनाय पर्वत थरथरु लागला.
इस्राएल लोकांनी पर्वतावर परमेश्वराचे तेज पाहिले; ते पर्वताच्या शिखरावर भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे होते.
माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो.
त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की निखारे धगधगू लागले.
परमेश्वरा, तुझ्या घनगंभीर आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या उच्छ्वासाने (समुद्राचे पाणीही मागे हटले) समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला.
असे लोक देवाच्या शिक्षेमुळे मारले जातात. देवाचा क्रोध त्यांना नष्ट करतो.
उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या गवतातून निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो.
देवाच्या नाकातून धूर आला देवाच्या तोंडातून अग्रीच्या ज्वाळा निघाल्या. त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या.
परमेश्वरा, तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला. आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.
अग्री परमेश्वराच्या पुढे जातो आणि शत्रूंचा नाश करतो.
पाहा! परमेश्वराचे नाव दुरवरून येत आहे, दाट धुराचे ढग पसरविणाऱ्या आगीप्रमाणे त्याचा राग आहे. परमेश्वराचे तोंड रागाने भरले आहे. त्याची जीभ ज्वालेप्रमाणे दिसत आहे.
पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे. ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्यात लाकडाचा ढीग आणि विस्तव आहे. परमेश्वराचा श्वास (आत्मा) जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे येऊन ते जाळून टाकील.
सर्वशक्तिमान परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या. “मी त्यांना शिक्षा करणार नाही असे ते लोक म्हणाले म्हणून, यिर्मया, मी जे शब्द तुला देतो, ते आगीप्रमाणे असतील, ते लोक लाकडाप्रमाणे असतील, ती आग त्यांना पूर्णपणे जाळून टाकील.”
यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला तुमच्या शत्रूचे गुलाम करीन. तुम्हाला अनोळखी असलेल्या प्रदेशात तुम्ही गुलाम व्हाल. मी खूप रागावलो आहे. माझा राग प्रखर अग्नीसारखा आहे. त्यात तुम्ही जाळले जाल.”
आजार त्याच्या आधी गेला. आणि नाश करणारा त्याच्यामागून गेला.
कारण आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.