त्यांनी माझी चेष्टा केली. पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.
Cross references
लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने चाल करुन आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेइर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.
मग पुढील हे लेवी पुन्हा बोलले: येशुवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथहग्र. ते म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन करा.”देवाचे अस्तित्व पहिल्यापासून आहे आणि परमेश्वर चिरकाल राहील. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत. तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो.
त्यांनी माझी चेष्टा केली. परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूंपासून माझे रक्षण झाले.
या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.
परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
मी देवाला मदतीसाठी हाक मारीन आणि परमेश्वर माझे रक्षण करील.
म्हणून मी तुला बोलावेन तेव्हा तू माझ्या शत्रूंचा पराभव कर. तू ते करु शकशील हे मला माहीत आहे, कारण तू देव आहेस.
देवा, माझ्यावर दया कर. दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो. संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे.
देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा. स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा.
परमेश्वर महान आहे आणि स्तुतीला योग्य आहे. तो इतर “देवांपेक्षा” भयंकर आहे.
परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही. देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही.
मी त्याला मदतीसाठी हाक मारतो आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.
नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले. मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.”
त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन.
मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन. मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांनो स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.”
“आमचा प्रभु आणि देव! तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्तकरुन घेण्यास योग्य आहेस. तू सर्व काही तयार केलेसतुला वाटत होते म्हणून सर्व काही अस्तित्वात आले आणि करण्यात आले.”
देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले,“जो वधलेला कोकरा होता तो सामर्थ्य, संपत्ति, शहाणपण आणि शक्ति, सन्मान, गौरव आणि स्तुतीस पात्र आहे!”