Home Bibles 2 शमुवेल 18:13 · मराठी बायबल
2 शमुवेल 18:13 · मराठी बायबल

अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते. आणि तुम्ही मला शिक्षा केली असती.”

Cross references

2 शमुवेल 1:15

पुढे दावीद त्याला म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस. तू अपराधी आहेस याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.” दावीदाने मग आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.

2 शमुवेल 4:10

यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्याला वाटले या बातमीबद्दल मी त्याला बक्षीस देईन पण मी त्याला धरून सिकलाग येथे ठार केले.

2 शमुवेल 14:19

राजा म्हणाला, “तुला हे सर्व बोलायला यवाबाने सांगितले का?”ती म्हणाली, “होय महाराज तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सर्व बोलायला सांगितले.

2 शमुवेल 14:20

अलिप्तपणे सर्व गोष्टी न्याहाळता याव्यात म्हणूनच, स्वरुप बदलून सांगायची युक्ती यवाबाने केली. तुम्ही देवदूता सारखेच चाणाक्ष आहात. तुम्हाला या पृथ्वीवरील सर्व घटना समजतात.”

इब्री लोकांस 4:13

आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत.

Interlinear

Choose Theme