2 शमुवेल 15:36 · मराठी बायबल
सादोकचा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा योनाथान हे ही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा.”
Cross references
2 शमुवेल 15:27
पुढे राजा सादोक याजकाला म्हणाला, “तू द्रष्टा आहेस तू सुखरुप नगरात परत जा. तुझा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान यांनाही घेऊन जा.
2 शमुवेल 17:17
योनाथान आणि अहीमास ही याजकांची मुले एन-रोगेल येथे थांबली. त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्या कडे आली. तिने त्यांना निरोप सांगितला तो त्यांनी राजा दावीदाकडे पोचवला.
2 शमुवेल 18:19
सादोकचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला, “मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्याला सांगतो.”
1 राजे 1:42
यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा मुलगा योनाथान तिथे आला. अदोनीया त्याला म्हणाला, “ये तू भला माणूस आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”