Home Bibles 2 शमुवेल 15:20 · मराठी बायबल
2 शमुवेल 15:20 · मराठी बायबल

तू कालच येऊन मला मिळालास. आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार. तू कशाला भटकंत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर. तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो.”

Cross references

1 शमुवेल 23:13

तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबर आलेली सुमारे साहशे माणसे यांनी कईला सोडले. ते गावोगाव भटकंत राहिले, दावीद निसटल्याचे शौलला कळले. त्यामुळे तो तेथे आलाच नाही.

2 शमुवेल 2:5

तेव्हा दावीदाने याबेश गिलादच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविथी करुन तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.

2 शमुवेल 2:6

देव तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे.

स्तोत्रसंहिता 25:10

जे लोक परमेश्वराचे करार आणि वचने पाळतात त्यांच्याशी तो सच्चा आणि दयाळू असतो.

स्तोत्रसंहिता 56:8

मी खूप चिंताक्रांत झालो आहे. मी किती रडलो ते तुला माहीत आहे. तू माझ्या अश्रूंची नक्कीच मोजदाद ठेवली असशील.

स्तोत्रसंहिता 57:3

तो स्वर्गातून मला मदत करतो आणि मला वाचवतो. मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो. देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो.

स्तोत्रसंहिता 59:15

ते खाण्यासाठी अन्न शोधतील पण त्यांना काही मिळणार नाही आणि झोपायला जागाही मिळणार नाही.

स्तोत्रसंहिता 61:7

त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे. तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर.

स्तोत्रसंहिता 61:8

आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन. ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.

स्तोत्रसंहिता 85:10

देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल. चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील.

स्तोत्रसंहिता 89:14

तुझे राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे. प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत.

नीतिसूत्रे 14:22

जो दुष्ट गोष्टींच्या योजना आखतो तो चूक करतो. पण जो चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याजवळ प्रेम करणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे मित्र असतात.

आमोस 8:12

लोक मृतसमुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील. परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील. पण त्यांना ते सापडणार नाहीत.

योहान 1:17

मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली.

2 तीमथ्थाला 1:16

अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही.

इब्री लोकांस 11:37

त्यांना दगडमार झाला. करवतीने त्यांना चिरण्यात आले, त्यांना तरवारीने मारण्यात आले. ते मेंढ्यांचे व बकऱ्यांचे कातडे पांघरून फिरत राहिले. ते निराधार झाले. त्यांना अती दबावाखाली भारी पीडा देण्यात आल्या.

Interlinear

Choose Theme