तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबर आलेली सुमारे साहशे माणसे यांनी कईला सोडले. ते गावोगाव भटकंत राहिले, दावीद निसटल्याचे शौलला कळले. त्यामुळे तो तेथे आलाच नाही.
Cross references
वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत सापडलेले, कर्जबाजारी झालेले. आयुष्याला त्रासलेले असे बरेच जण दावीदकडे आले. त्याच्या भोवती अशी चारशे माणसे जमली. त्यांचा तो नेता होता.
तेव्हा दावीद त्यांना म्हणाला, “आता तलवारी हाती घ्या” आणि दावीदसकट या सर्वांनी शस्त्र उचलले. जवळजवळ चारशे जण दावीद बरोबर होते. दोनशे माणसे तेथेच सामानसुमानाजवळ राहिली.
दावीदाने मग आपल्याबरोबर सहाशे जणांना घेतले आणि ते सर्व बसोर नदीजवळ पोचले. त्यांच्यापैकी दोनशेजण इतके थकले की त्यांना पुढे जाववेना. ते तिथेच राहिले. तेव्हा उरलेली चारशे माणसे दावीद बरोबर पुढे अमालेक्यांच्या पाठलागावर गेली.
तू कालच येऊन मला मिळालास. आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार. तू कशाला भटकंत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर. तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो.”
देव धूर्तांचे कार्य बंद पाडतो आणि त्यांना सफलता मिळू देत नाही.
देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल लाज वाटून घेऊ नका.