अम्नोनला योनादाब नावाचा मित्र होता. दावीदाचा भाऊ शिमा याचा हा मुलगा. योनादाब धूर्त होता.
Cross references
परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?”
त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुलाम नगरातील हीरा नावाच्या माणसाबरोबर त्याच्या घरी राहावयास गेला.
आपण कबूल केल्याप्रमाणे त्या वेश्येला बकरा देण्यासाठी यहुदाने आपला मित्र हीरा याला एनाईम गांवाला त्या वेश्येकडे पाठवले. त्याचप्रमाणे आपण तिला दिलेल्या, शिक्का, दोरी व काही वस्तू तिजकडून घेऊन येण्यास सांगितले, परंतु हीराला ती वेश्या सांपडली नाही.
बायकोला मात्र त्याने आपल्याबरोबर घेतले नाही. विवाह सोहव्व्यातील एका माणसाला देऊन टाकण्यात आले.
मग इशायने शम्माला शमुवेलच्या समोर यायला सांगितले. तेव्हाही शमुवेल म्हणाला, “हाही तो नव्हे.”
पण, दावीदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, “सर्व मुले गेली असे समजू नकोस. फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हा पासूनच अबशालोमच्या डोक्यात ही योजना तयार होत होती.
तेव्हा तकोवा येथे निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर बाईला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, “तू खूप दु:खात असल्याचे ढोंग कर. त्याला शोभेसे कपडे कर. नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या बाईसारखी तू दिसली पाहिजेस.
राजा म्हणाला, “तुला हे सर्व बोलायला यवाबाने सांगितले का?”ती म्हणाली, “होय महाराज तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सर्व बोलायला सांगितले.
त्याने इस्राएलला आव्हान दिले पण योनाथानने या माणसाचे प्राण घेतले. (हा योनाथान म्हणजे दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा.)
इशायचा मुलगा अलीयाब. अलीयाब हा इशायचा पहिला पुत्र, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा.
योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखनिक होता. हा दावीदाचा काका. हखमोनी याचा मुलगा यहोएल याच्यावर राजपुत्रांच्या लालनपालनाची जबाबदारी होती.
पण आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि बायको जेरेश यांना त्याने बोलावले.
मग हामानची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र यांनी एक सूचना मांडली ते म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक स्तंभ उभारायला सांग तो75फूट उंच असू दे. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.”हामानला ती सूचना आवडली म्हणून त्याने फाशीचा स्तंभ उभारायची आज्ञा केली.
आपली बायको जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने जे जे झाले ते सगळे सांगितले, हामानची बायको आणि त्याला सल्ला देणारे मित्र त्याला म्हणाले, “मर्दखय यहुदी असेल तर तुझी जीत होणे शक्य नाही. तुझ्या अध:पाताला सुरुवात झाली आहे. तुझा विनाश होईल हे नक्की.”
पुष्कळांना राज्यकर्त्यांबरोबर मैत्री करायची असते आणि जो माणूस नजराणे देतो त्याच्याबरोबर तर सर्वांनाच मैत्री करायची असते.
देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत. ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख मुले आहेत त्यांना समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण सत्कृत्ये कशी करावी त्यांना माहीत नाही.”
कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. असे लिहिले आहे, “देव शहाण्यांना हुशारीमध्ये पकडतो.”
कारण अशा प्रकारचे शहाणपण वरून, स्वर्गातून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे. अधार्मिक आणि सैतानी आहे.