Home Bibles 1 करिंथकरांस 3:19 · मराठी बायबल
1 करिंथकरांस 3:19 · मराठी बायबल

कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. असे लिहिले आहे, “देव शहाण्यांना हुशारीमध्ये पकडतो.”

Cross references

निर्गम 1:10

त्यांची वाढ थांबवावी म्हणून आपण काहीतरी उपाय योजना केलीच पाहिजे. जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे इस्राएल लोक आपल्या शत्रुला जाऊन मिळतील; आणि मग ते आपला पराभव करुन आपणापासून निसटून जातील.”

निर्गम 18:11

परमेश्वर सर्व देवांहून महान आहे हे आता मला कळाले, कारण इस्राएल लोकापेक्षा स्वत:ला चांगले मानीत असलेल्या इतर लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”

2 शमुवेल 15:31

एकाने दावीदाला सांगितले, “अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे.” तेव्हा दावीदाने देवाची करुणा भाकली. तो म्हणाला, “परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे.”

2 शमुवेल 16:23

अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांना त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटले.

2 शमुवेल 17:14

अबशालोम आणि सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहिथोफेलपेक्षा हूशय अकर्चा सल्ला च्रेयस्कर आहे.” ती म्हणून सर्वांना पसंत पडली कारण ती परमेश्वराची योजनाच होती. अबशालोमला अद्दल घडावी म्हणून अहिथोफेलचा चांगला सल्ला थोपवून कुचकामी ठरवण्याचा तो परमेश्वराचा बेत होता. अशा प्रकारे तो अबशालोमला अद्दल घडवणार होता.

2 शमुवेल 17:23

इस्राएल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वत:ला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडीलांच्या कबरीतच दफन केले.

एस्तेर 7:10

तेव्हा मर्दखयसाठी उभारलेल्या स्तंभावर हामानला फाशी देण्यात आली. राजाचा क्रोध शमला.

ईयोब 5:13

13तो विद्वानांना त्यांच्याच कचाट्यात पकडतो त्यामुळे त्यांचे कार्य सिध्दीस जात नाही. (मसलत फुकट जातेते दिवसासुध्दा ठेचाळतात.

स्तोत्रसंहिता 7:14

काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.

स्तोत्रसंहिता 9:15

ती इतर राष्ट्रे दुसऱ्या लोकांना सापळ्यात पकडण्यासाठी खड्डे खणतात. परंतु ते स्वतच त्या खड्यांत पडले. दुसऱ्यांना पकडण्यासाठी त्यांनी जाळे लावले. परंतु ते स्वतच त्या जाळ्यात अडकले.

स्तोत्रसंहिता 141:10

वाईट लोकांना त्यांच्याच सापळ्यात पडू दे आणि मला कसलीही इजा न होता दूर जाऊ दे.

यशया 19:11

“सोअनचे नेते मूर्ख आहेत. फारोचे ‘शहाणे सल्लागार’ चुकीचा सल्ला देतात. हे नेते स्वत:ला शहाणे समजतात. ते म्हणतात की आम्ही पूर्वीच्या राजघराण्यातील आहोत. पण ते स्वत:ला जेवढे शहाणे समजतात तेवढे ते नाहीत.”

यशया 29:14

म्हणून मी शक्तिशाली व चमत्कारिक गोष्टी करून या लोकांना विस्मित करीत राहीन. त्यांच्यातील सुज्ञ स्वत:तील शहाणपण गमावतील. त्यांना काही समजू शकणार नाही.”

यशया 44:25

खोटे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. पण परमेश्वर त्यांचा खोटेपणा उघड करतो. जादूटोणा करणाऱ्यांना परमेश्वर मूर्ख बनवितो. शहाण्यांनासुध्दा परमेश्वर गोंधळात टाकतो. त्यांना वाटते आपल्याला फार समजते पण देव त्यांना हास्यास्पद बनवितो. 26लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो.

रोमकरांस 1:21

कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंत;करणे अंधकारमय झाली.

1 करिंथकरांस 1:19

कारण पवित्र शास्त्रांत असे लिहिले आहे,“शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन, आणि बुद्धिवंतांची बुध्दि मी बाजूला करीन.”

1 करिंथकरांस 2:6

परंतु जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही ज्ञान देतो. या युगाच्या अधिकाऱ्यांना नव्हे, ज्यांचा शेवट करण्यासाठी आणण्यात येत आहे.

Interlinear

Choose Theme