2 शमुवेल 1:13 · मराठी बायबल
शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाशी दावीद बोलला. त्याला दावीदाने विचारले, “तू कुठला?” त्याने सांगितले. “मी अमालेकी असून एका परदेशी माणसाचा मुलगा आहे.”
Cross references
1 शमुवेल 30:13
दावीदाने त्याला विचारले, “तुझा मालक कोण? तू आलास कुठून?”तो मिसरी म्हणाला, “मी मिसरी असून एका अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपूर्वी मी आजारी पडलो तेव्हा माझ्या धन्याने मला सोडून दिले.
2 शमुवेल 1:8
त्याने माझी चौकशी केली. मी अमालेकी असल्याचे त्याला सांगितले.