पहारेकऱ्याने योरामला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा माणूसही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच पध्दत आहे.
Cross references
पहारेकरी म्हणाला, “पहिल्याचे धावणे मला सादोकचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते.”राजा म्हणाला, “अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार”
हजाएल अनेक पापी माणसांना ठार करेल. त्याच्या तावडीतून जे सुटतील त्यांना येहू मारील. आणि यातूनही कोणी निसटले तर त्याला अलीशा मारील.
येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्याला त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने.
येहू यहोनादाबला म्हणाला, “चल माझ्या बरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कटता आहे ती बघ.”तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला.
प्रत्येक वेळी जे काम असेल ते उत्तम प्रकारे करा. कबरेत काम नसते. तिथे विचार नसतात. ज्ञान नसते आणि शहाणपणही नसते. आणि आपण सर्व त्या मृत्युलोकात जाणार आहोत.
“बघ! मी लोहार निर्मिला. तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो. मग तापलेल्या लोखंडापासून त्याला पाहिजे तसे हत्यार तो बनवितो. त्याचप्रमाणे मी ‘नाश’ करणारा घडविला आहे.
पण उत्तरेच्या राजाला पूर्व व उत्तर दिशेकडून ऐकलेल्या बातम्यांनी भीती वाटेल व रागही येईल. व तो अनेक राष्ट्रांचासंपूर्ण नाश करण्यासाठी निघेल.
मी बाबेलला एक बलिष्ठ राष्ट्र बनवीन, तेथील लोक क्षुद्र वृत्तीचे पण समर्थ आणि दुष्ट लढवय्ये आहेत. ते सर्व जग पायाखाली घालतील. त्यांच्या मालकीची नसलेली घरे व गावे, ते स्वत:च्या ताब्यात घेतील.
रागाच्या भरात, तू पृथ्वी पायाखाली तुडविलीस आणि राष्ट्रांना शिक्षा केलीस.