Home Bibles हबक्कूक 1:6 · मराठी बायबल
हबक्कूक 1:6 · मराठी बायबल

मी बाबेलला एक बलिष्ठ राष्ट्र बनवीन, तेथील लोक क्षुद्र वृत्तीचे पण समर्थ आणि दुष्ट लढवय्ये आहेत. ते सर्व जग पायाखाली घालतील. त्यांच्या मालकीची नसलेली घरे व गावे, ते स्वत:च्या ताब्यात घेतील.

Cross references

अनुवाद 28:49

“दूरच्या राष्ट्रातील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील.

2 राजे 24:1

यहोयाकीमच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यहूदात आला. यहोयाकीमने तीन वर्षे त्याचे मांडलिकत्व पत्करले आणि नंतर फितूर होऊन त्याने बंड केले.

2 राजे 24:2

यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने बाबेल, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे जे घडेल म्हणून सांगितले होते त्याप्रमाणेच घडत होते. यूहदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.

2 इतिहास 36:6

बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदावर हल्ला केला. त्याने यहोयाकीमला कैद केले आणि त्याला पितळी बेड्या ठोकल्या. तशा अवस्थेत त्याला नबुखद्नेस्सरने बाबेलला नेले.

2 इतिहास 36:17

तेव्हा बाबेलच्या राजाला देवाने यहूदा व यरुशलेमवर स्वारी कारयला लावले. बाबेलच्या राजाने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरुशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांना जिवे मारताना तरुण-वृध्द, स्त्री-पुरुष, रोगी-निरोगी असा भेदाभेद बाळगला नाही. देवानेच नबुखद्नेस्सरला यहूदा व यरुशलेमच्या लोकांना शासन करायची मुभा दीली होती.

यशया 23:13

मग सोर लोक म्हणतात, “बाबेलोनमधील लोक आम्हाला मदत करतील.” पण खास्द्यांच्या भूमीकडे (बाबेलोनकडे) पाहा. बाबेलोन आता देश राहिलेला नाही. अश्शूरने बाबेलोनवर हल्ला केला आणि त्याच्या भोवती युध्दस्तंभ उभारले. सुंदर घरातील सर्व चीजवस्तू सैनिकांनी लुटल्या. अश्शूरांनी बाबेलोनला जंगली जनावरांना राहण्यायोग्य बनविले. त्यांनी बाबेलोनला पूर्णपणे उजाड केले.

यशया 39:6

“भविष्यात, तुझ्या पूर्वजांनी आणि तू आतापर्यंत जे जमविले आहे ते सर्व लुटले जाईल आणि बाबेलला नेले जाईल.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले.

यिर्मया 1:15

काही काळाने मी उत्तरेकडील राज्यातील सर्व लोकांना बोलवीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या: “त्या देशातील राजे येतील आणि यरुशलेमच्या वेशीजवळ आपली सिहांसने स्थापन करतील. ते शहराच्या तटबंदीवर हल्ला करतील. ते यहूदातील सर्व शहरांवर चढाई करतील.

यिर्मया 4:6

खुणेचे ध्वज सियोनच्या दिशेने दाखवा. जीव वाचविण्यासाठी पळा. वाट पाहू नका. कारण मी उत्तरेकडून अरिष्ट आणीत आहे. मी भयानक विध्वंस घडवून आणीत आहे.”

यिर्मया 4:8

म्हणून शोकवस्त्रे घाला आणि मोठ्याने आक्रोश करा. का? कारण परमेश्वर आमच्यावर रागावला आहे.”

यिर्मया 5:15

इस्राएलच्या वारसांनो हा परमेश्वराचा संदेश आहे. “दूरवरच्या राष्ट्राला मी, तुमच्यावर हल्ला करण्यासाठी लवकरच आणीन. ते शक्तिशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील लोक तुम्हाला माहीत नसणारी भाषा बोलतात. ते काय बोलतात ते तुम्ही समजू शकणार नाही.

यिर्मया 6:22

परमेश्वर पुढे असे म्हणतो: “उत्तरेकडून सैन्य येत आहे. पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे.

यिर्मया 6:23

त्या सैनिकांजवळ धनुष्यबाण आहेत. ते क्रूर आहेत. त्यांना दया माहीत नाही. ते खूप शक्तिशाली आहेत. ते घोड्यावर स्वार होऊन येतात, तेव्हा समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज येतो. ते युद्धाच्या तयारीने येत आहेत. सियोनच्या कन्ये, ते सैन्य तुझ्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे.

यिर्मया 21:4

परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो “तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन.“बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरुशलेममध्ये आणीन.

यिर्मया 25:9

म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना बोलावून घेईन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी लवकरच बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याला निरोप पाठवीन. तो माझा सेवक आहे. मी त्यांना यहूदा व यहूदातील लोक यांच्याविरुध्द उठवीन. तुमच्या देशाभोवतालच्या राष्ट्रांच्यासुद्धा विरोधात मी त्यांना आणीन. मी त्या सर्व देशांचा नाश करीन. मी त्या भूमीचे कायमचे ओसाड वाळवंट बनवीन. लोक ते देश व त्याचा वाईट प्रकारे झालेला नाश पाहतील व हळहळतील.

यिर्मया 30:5

परमेश्वर म्हणाला,“लोकांचे भीतीने रडणे आम्हाला ऐकू येते. लोक घाबरले आहेत. कोठेही शांती नाही.

योएल 2:3

धगधगती आग जसा नाश करते, तसा देशाचा नाश हे सैन्य करील. त्यांच्यासमोरची भूमी एदेनच्या बागेसारखी असेल, पण त्यांच्या मागे निर्जन वाळवंट असेल.त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.

Interlinear

Choose Theme