परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस. तू म्हणालास, “माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर, लबानोनच्या अंतर्भागात आलो आहे. त्यांचे उंच गंधसरु आणि उत्तम देवदारु मी तोडीन. लबानोन मध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे.
Cross references
अश्शूरच्या राजाने मोठ्या सैन्यासोबत आपले तीन महत्वाचे सेनापती यरुशलेममध्ये राजा हिज्कीयाकडे पाठवले. तेव्हा ते लाखीश येथून यरुशलेमला निघाले. वरच्या तलावाच्या पाटापाशी ते उभे राहिले. (परिटाच्या शेताकडे जो रस्ता जातो त्या वाटेवर हा वरचा तलाव आहे)
आता माझा स्वामी अश्शूराचा राजा याच्याशी हा करार कर. तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर मी तुला दोन हजार घोडे द्यायचे कबूल करतो.
इतर दैवतांनी आपले देश अश्शूरच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.
त्या सेनापतीचा स्वामी अश्शूराचा राजा याने त्याला आपल्या जिवंत देवाची निंदा करायला पाठवले होते. कदाचित् हे सर्व आपल्या परमेश्वर देवाच्या कानावर जाईल. शत्रूचा अंदाज चुकीचा आहे हे तो दाखवूनही देईल. तेव्हा अजून जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना कर.”‘
वाळवंटातही त्याने बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या निगराणीसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.
अश्शूरच्या राजाने पत्रांमध्ये परमेश्वर देवा विषयी अपमानकारक मजकूरही लिहिला. तो असा होता. “इतर देशांच्या दैवतांना मी केलेल्या संहारापासून आपल्या प्रजेला वाचवता आले नाही. तद्वतच हिज्कीयाचा देवही मला त्याच्या प्रजेचा नाश करण्यापासून थोपवू शकणार नाही.”
काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवतात परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला. ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.
“पण मी अश्शूरचा उपयोग करून घेणार आहे हे त्याला कळत नाही. मी त्याचा साधन म्हणून उपयोग करीन असे त्याच्या लक्षात येत नाही. अश्शूरला फक्त इतर लोकांचा नाश करायचा आहे, खूप राष्ट्रांचा घात करण्याचा त्याचा बेत आहे.
अश्शूरचा राजा म्हणतो, “मी फार सुज्ञ आहे. माझ्या चातुर्याच्या व सामर्थ्याच्या बळावर मी फार मोठ्या गोष्टी केल्या आहेत. मी पुष्कळ राष्ट्रंाना पराभूत केले आहे. मी त्यांची संपत्ती लुटली आणि तेथील लोकांना गुलाम केले. मी फार सामर्थ्यवान आहे.
पक्ष्याच्या घरट्यातून एखाद्याने सहज अंडी काढून घ्यावीत त्याप्रमाणे माझ्या ह्या दोन हातांनी ह्या सवंर्ाची संपत्ती घेतली आहे. पक्षी नेहमी घरटी व अंडी सोडून जातो. आणि घरट्याचे रक्षण करण्यास कोणीच नसते. तेथे एकही पक्षी चिवचिवाट करायला अथवा पंख व चोच ह्याने टोचा मारायला नसतो. त्यामुळे लोक सहज अंडी काढून घेऊ शकतात. अगदी असेच मी सर्व जगातील माणसांना लुटले. मला थांबविणारा कोणीही नव्हता.”
नंतर आग पसरते आणि मोठे वृक्ष, द्राक्षमळे जळून जातात. व सर्वांत शेवटी प्रत्येक गोष्ट जळून नष्ट होते-अगदी माणसेसुध्दा, तसेच तेव्हा होईल आणि अश्शूरचा देवाकडून नाश होईल. अश्शूर कुजणाऱ्या ओंडक्याप्रमाणे होईल.
परमेश्वर, माझ्या प्रभुविरूध्द बोलण्यासाठी तू तुझ्या नोकरांचा उपयोग केलास. तू म्हणालास, “मी फार सामर्थ्यवान आहे माझ्याजवळ पुष्कळ रथ आहेत माझ्या बळावर मी लबानोनला हरविले. मी तेथील उंच डोंगरावर चढलो. मी तेथील सर्व उंच झाडे (सैन्ये) तोडली, मी तेथील उंच डोंगरावर व घनदाट जंगलात जाऊन आलो.
अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.