Home Bibles 2 राजे 18:33 · मराठी बायबल
2 राजे 18:33 · मराठी बायबल

इतर दैवतांनी आपले देश अश्शूरच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.

Cross references

2 राजे 19:12

त्या राष्ट्रांच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले.

2 राजे 19:13

हमाथ, अर्पाद, सफरवाईम, हेना आणि इळा यांचे राजे कुठे आहेत? त्यांचा पार धुळा उडाला आहे.”

2 राजे 19:17

खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. 17खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत.

2 इतिहास 32:14

माझ्या पूर्वजांनी इतर देशांना मातीला मिळवले. आपल्या लोकांना विनाशातून सोडवण्याची माझ्यासमोर कोणत्याही देवताची प्राज्ञा नाही. तेव्हा तुमचे दैवत तरी तुम्हाला वाचवू शकेल असे वाटते का?

2 इतिहास 32:19

जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईटसाईट बोलत राहिले. हे परमेश्वर म्हणजे लोकांनी निव्वळ हातांनी बनवलेल्या मूर्तीं यरुशलेमच्या परमेश्वरालाही या सेवकांनी त्या देवतांच्याच रांगेला बसवले.

यशया 10:10

मी त्या दुष्ट राज्यांचा पराभव केला आणि आता मी त्यांच्यावर सत्ता गाजवितो. त्यांच्या पूजेच्या मूर्ती यरूशलेममधील व शोमरोनमधील मूर्तीपेक्षा चांगल्या आहेत.

यशया 36:18

हिज्कीयाकडून फसवले जाऊ नका. तो म्हणतो, “परमेश्वर आपल्याला वाचवील.” पण मी तुम्हाला विचारतो की कोठल्या राष्ट्रतील देवाने आपल्या राष्ट्रातील लोकांना अश्शूरच्या सामर्थ्यापासून वाचाविले आहे? कोणीही नाही. आम्ही त्या प्रत्येकाला पराभूत केले.

Interlinear

Choose Theme