Home Bibles 2 राजे 19:21 · मराठी बायबल
2 राजे 19:21 · मराठी बायबल

“सन्हेरीबबद्दल परमेश्वराचा असा निरोप आहे. सीयोनच्या (म्हणजेच यरुशलेमच्या) कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून तुझा अपमान केला आहे. यरुशलेम कन्या तुझी पाठ वळली की तुझा उपहास करते.

Cross references

ईयोब 16:4

जर तुमच्यावर माझ्यासारखे संकट आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात तेच मीही म्हणू शकलो असतो. मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो.

स्तोत्रसंहिता 9:14

नंतर यरुशलेमच्या द्वारात परमेश्वरा, मी तुझी स्तुती गाईन. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी खूप आनंदात असेन.”

स्तोत्रसंहिता 22:7

माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो. ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.

स्तोत्रसंहिता 109:25

वाईट लोक माझा अपमान करतात. ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.

स्तोत्रसंहिता 137:8

ख जो तुला देईल त्याला धन्यवाद.

यशया 1:8

सीयोनची मुलगी (यरूशलेम) द्राक्षांच्या बागेतील रिकाम्या खोपटाप्रमाणे झाली आहे. तिची अवस्था काकडीच्या शेतातील जुन्या घराप्रमाणे झाली आहे. शत्रूने पराभूत केलेल्या नगराप्रमाणे ती दिसते.”

यशया 23:10

तार्शीशच्या गलबतांनो, तुम्ही स्वदेशी परत जाणे योग्य. लहान नदी जशी पार करतात, तसा समुद्र पार करा. तुम्हाला आता कोणीही अडवणार नाही.

यशया 23:12

परमेश्वर म्हणतो, “सीदोनच्या कुमारिके, तुझा नाश होईल. तू पुन्हा आनंदित होणार नाहीस.” पण सोरचे रहिवासी म्हणतात, “सायप्रस आम्हाला मदत करील.” पण जरी तुम्ही समुद्र पार करून सायप्रसला गेलात, तरी तुम्हाला तेथे आराम करायला जागा मिळणार नाही.

यशया 37:21

नंतर आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठविला. यशया म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो. ‘तू परमेश्वराची, इस्राएलच्या देवाची, प्रार्थना केलीस. सन्हेरिबकडून आलेल्या निरोपासाठी ती प्रार्थना होती. मी ती प्रार्थना ऐकली आहे.’

यशया 47:1

“धुळीत पड आणि तेथेच बस! खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कुमारिके, जमिनीवर बस. तू आता सत्तेवर नाहीस. लोक तुला नाजूक, कुमारी समजणार नाहीत.

यशया 47:5

“बाबेल, तेथेच शांत बसून राहा. खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कन्ये, अंधारात जा, का? कारण तू यापुढे ‘राज्याची राणी’ राहणार नाहीस.

यिर्मया 14:17

“यिर्मया, यहूदाच्या लोकांना माझा संदेश सांग: ‘माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून आलेत. माझ्या कुमारी मुलीसाठी मी रात्रंदिवस अव्याहतपणे आक्रोश करीन. माझ्या लोकांसाठी मी न थांबता आक्रोश करीन. का? कारण कोणीतरी त्यांच्यावर वार करुन त्यांना चिरडले आहे. ते लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

यिर्मया 18:13

परमेश्वर सांगत असलेल्या गोष्टी ऐका: “दुसऱ्या राष्ट्रांना हा प्रश्न विचारा. ‘इस्राएलने केलेल्या पापाप्रमाणे, पापे आणखी कोणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का?’ आणि इस्राएल तर देवाच्या दृष्टीने विशेष आहे. ती देवाच्या वधूप्रमाणे आहे.

यिर्मया 31:4

“इस्राएल, माझ्या वधू, मी तुझी पुन्हा निर्मिती करीन. तुझ्यातून देश निर्माण करीन. तू तुझी खंजिरी उचलशील आणि मौजमजा करणाऱ्या इतर लोकांबरोबर नृत्यात सामील होशील.

यिर्मया 46:11

“मिसर, गिलादला जा आणि काही औषध मिळव. तू खूप औषधे मिळवशील, पण त्याचा उपयोग होणार नाही तू बरा होणार नाहीस.

विलापगीत 1:15

“माझ्या शूर सैनिकांना परमेश्वराने दूर लोटले. मग माझ्या विरुध्द लढण्यासाठी व माझ्या तरुण सैनिकांना मारण्यासाठी परमेश्वराने काही लोक आणले. देवाने द्राक्षकुंडातील द्राक्षे तुडविली. ते द्राक्षकुंड यरुशलेमच्या कुमारी कन्येचे आहे.

विलापगीत 2:13

सियोनच्या कुमारी कन्ये, मी तुझी तुलना कोणाशी करू शकतो? कशाबरोबर मी तुझी तुलना करू हे सियोनच्या कुमारी कन्ये? मी तुझे सांत्वन कसे करू? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोणी बरे करु शकेल असे मला वाटत नाही.

विलापगीत 2:15

रस्त्यावरून जाणारे तुला पाहून हादरतात व हळहळतात. यरुशलेमच्या कन्येकडे बघून ते चुकचुकतात. ते विचारतात, “लोक जिला “सौंदर्यपूर्ण नगरी” अथवा “पृथ्वीवरचा आनंद म्हणतात, ती नगरी हीच का?””

विलापगीत 4:21

अदोमच्या लोकांनो, आनंदित व्हा. ऊस देशात राहणाऱ्यांनो, हर्षित व्हा. पण लक्षात ठेवा की परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल. तुम्ही जेव्हा त्यातील पेय (शिक्षा) प्याल, तेव्हा झिंगाल आणि विवस्त्र व्हाल.

आमोस 5:2

इस्राएलची कुमारिका पडली आहे. ती पुन्हा कधीही उठणार नाही. तिला एकटीलाच सोडून दिले आहे ती धुळीत लोळत आहे. तिला उठवणारा कोणीही नाही.

मीखा 4:8

आणि तू, कळपाच्या मनोऱ्या, तुझी वेळ येईल. योफल, सियोनच्या टेकाडा, तू पुन्हा शासनाची जागा होशील. हो! पूर्वीप्रमाणेच राज्य यरुशलेममध्ये असेल.”

जखऱ्या 9:9

सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे.

मत्तय 27:39

जवळून जाणारे लोक येशूची निंदा करु लागले. ते डोकी हलवू लागले.

Interlinear

Choose Theme